मुंबई:शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच सक्तवसुली संचालनालयाने(ED) राऊत यांची 11 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या कारवाईनंतर आता भाजप नेत्याने राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी संजय राऊत यांच्यावर धमकावून लाखो रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.
राऊतांवर धमकावून पैसे घेतल्याचा आरोपकेंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईनंतर भाजप विरुद्ध शिवसेना वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच बुधवारी ईडीने संजय राऊथ यांची संपत्ती जप्त केल्यानंतर राजकीय हालचालींना आणखी वेग आला. यानंतर आता आज भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर धमकावल्याचा आणि पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
मोहित कंबोज यांचं ट्वीट-
'पोलीस गुन्हा दाखल करणार का?' मोहित कंबोज यांनी व्हिडीओ शेअर करत राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''संजय राऊत यांनी 2014 साली मला सामनाच्या कार्यालयात बोलावले आणि धमकावून पैशांची मागणी केली. त्यांनी मला 50 लाखांची मागणी केली होती. त्यातील 25 लाख चेक स्वरुपात घेतले. हे पैसे व्याजासह परत करणार असल्याचे त्यांनी सांगितले, पण अजून पैसे परत केले नाहीत. या प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत, मी तक्रारही करत आहे. संजय पांडे, तुम्ही गुन्हा दाखल करणार का?'' असा सवाल कंबोज यांनी उपस्थित केला आहे.