शिवसेनेत २१ जून २०२२ रोजी दोन गट पडले. सेनेत दोन गट पडल्याचं २२ जूनला निदर्शनास आले. पक्षात पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारणी महत्त्वाची असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार बहुमताला आहे. त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्याने शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो. भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. "भावपूर्ण श्रद्धांजली, लोकशाही. १९५० - २०२३. शोकाकुल :- महाराष्ट्र" असं म्हणत एक फोटो ट्विट केला आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून "चश्मदीद अंधा बना, बहरा सुने दलील, झूठों का है दबदबा, सच्चा हुआ जलील... जय महाराष्ट्र!" असं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राहुल नार्वेकर, गिरिश महाजन यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
संजय राऊत यांनी काल "हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार आहोत" असं म्हटलं होतं. तसेच दिल्लीतून जे आदेश मिळाले ते आदेश येथे दिले आहेत. संविधान, कायदा, सत्य काय आहे यावर हे आदेश नाहीत. जमिनीवरचे सत्य या आदेशात नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना ६० वर्षांआधी स्थापना झाली होती. शिवसेनेचे आजचे मालक एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या स्थापनेवेळी किती वय किती होते? त्यांचा तेव्हा जन्म तरी झाला होता का? बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना इतिहासजमा झाली. भाजपाचे जुनं स्वप्न होते की बाळसाहेबांची शिवसेना एकदिवस संपवणार. पण त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. पण बाळासाहेबांची शिवसेना अशा निर्णयांमुळे, अशा कागदपत्रांमुळे संपणार नाही. तर, शिवसेना जतनतेत आहे. महाराष्ट्रातील रक्ता-रक्तात आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
"हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार. न्यायालयात आम्ही आमची लढाई सुरूच ठेवणार आहोत. राहुल नार्वेकरांना इतिहास लिहायची संधी दिली होती. त्यांनी ती संधी गमावली आहे. या व्यक्तीनेही महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. संविधानपीठात बसून त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला. इतिहास त्यांना लक्षात ठेवेल. या निर्णयाविरोधा जे फटाके वाजवत आहेत ते महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान आहे. यांची अवस्था ही इटलीतील मुसोलिनीसारखी होईल" अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली होती.