"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 05:10 PM2024-05-19T17:10:10+5:302024-05-19T17:11:28+5:30

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या दाव्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर

Sanjay Raut opposed Eknath Shinde for chief minister post says Ajit Pawar group leader Umesh Patil | "एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार

"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार

Eknath Shinde vs Sanjay Raut vs Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी महाराष्ट्रासह मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. 'एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही तयार होतो पण त्यांची आपआपसात चर्चा झाली' असे शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजित पवार यांचा विरोध होता, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने पलटवार केला आहे.

"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध होता मात्र आता ते अजितदादा, सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे करून धांदात खोटे बोलत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्यावेळी उध्दव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पदाचे नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी हात वर करून जाहीर केले होते. शरद पवार यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते असे जाहीर सांगितले होते परंतु आता संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला अजितदादा, सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला त्यामुळे नाईलाजाने उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले ही चुकीची माहिती संजय राऊत देत आहेत", असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

"राजकारणात सर्वच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, संजय राऊत आणि त्यावेळेचे आमचे वरीष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उध्दव ठाकरे आणि अडीच वर्षानंतर एक वेगळे नाव ठरले होते आणि त्या नावाची गोपनीयता बाळगण्यात आली होती. याबाबत पक्षातील अजितदादा, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे या नेत्यांना माहिती दिली नव्हती. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता मात्र अजितदादा ऐवजी तो कोण असणार याची गोपनीयता ठेवण्यात आली होती. ते नाव फक्त आमचे त्यावेळचे वरीष्ठ नेते, उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच माहीत होते त्यामुळे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खुलासा करावा," अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.

Web Title: Sanjay Raut opposed Eknath Shinde for chief minister post says Ajit Pawar group leader Umesh Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.