मुंबई: एकीकडे देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून, दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. देशातील अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्रानेही कोरोना लस मोफत देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील एक ट्विट डिलीट केल्यानंतर यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (sanjay raut react on free vaccination in maharashtra and aditya thackeray tweet issue)
महाराष्ट्रातील जनतेला कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी जाहीर केले. यानंतर मोफत कोरोना लसीकरणासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केले होते. मात्र, कालांतराने ते ट्विट डिलीट केले. यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी
हा सरकारचा विषय, मी बोलू शकत नाही
हा सरकारचा विषय आहे. यावर काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील, अशी सावध प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस
मुंबईत कोरोना नियंत्रणात येतोय
मुंबईत कोरोनाचा डबलिंग रेट कमी झाला आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात येत आहे. विरोधकांनी राजकारण करण्याची ही वेळ नसून, सरकारसोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष केला; तरच, संकट मागे जाईल. मुख्यमंत्री पूर्ण जोर लावत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
“कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र
महाविकास आघाडीत नाराजी
मोफत लसीकरणावर आमची भूमिका स्पष्ट आहे. सोनिया गांधी यांनी तसे सांगितले असून, लस मोफत दिली पाहिजे असा आग्रह धरला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह धरला असून मान्य होईल, अशी आशा आहे. मुख्यमंत्री यावर विचार करत असताना श्रेय घेण्यासाटी कोणी जाहीर करते हे आम्हाला आवडले नाही, काँग्रेस म्हणून आमची नाराजी आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.