मुंबई: काल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आजही मीडियाशी संवाद साधताना राऊतांनी भाजपला थेट आव्हान दिले. 'ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय तपास यंत्रणांची चिलखतं चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, तर नाव सांगणार नाही', असा इशाराच त्यांनी दिला.
ईडी, सीबीआय भाजपची चिलखतमीडियाशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, अंगावरती वर्दी असेल तर कुणाच्याही अंगावर जाता येत. आपण सिनेमात पाहतो, वर्दी असलेला कुठलीही बेकायदेशीर कामे करतो. तशी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही भाजपची चिलखत आहेत. ही चिलखत घालून ते लढत असतात. हिंमत असेल तर चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर आम्ही नाव सांगणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्याच्याशी आम्ही ठाम आहोत, असं राऊत म्हणाले.
भाजपला साथ देणाऱ्यांचे हालराऊत पुढे म्हणाले की, युतीत 25 वर्ष सडली हे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं नाही. महाराष्ट्रात भाजपला जमिनीवरून आस्मानापर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं. आम्ही युतीचा धर्म पाळला, पण जे झालं ते झालं. काल उद्धव ठाकरेंनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. फक्त शिवसेनाच नाही, तर भाजपसोबत गेलेल्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
शिवसेनेला संपवू शकत नाहीआम्ही तुम्हाला घाबरत नाही, काय करणार आहात तुम्ही? आम्ही सगळेच लढत आहोत. खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, तुमचं आयटीफायटी सेल आहे, त्यातून बदनामी कराल किंवा हरेन पंड्यांप्रमाणे गोळी माराल. दुसरं तुम्ही काही करू शकत नाहीत. तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही, असंही ते म्हणाले.