शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

'चंद्रकांत पाटलांना पहाटेच्या शपथविधीचे झटके येत असतील', संजय राऊतांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 4:54 PM

'एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे,काहीतरी तोडगा लवकरच निघेल'

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Strike) सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut)  यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी माध्यमाशी संवाद साधताना राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर पहाटेच्या शपथविधीवरुन निशाणा साधला.

संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये दोन तास बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्दयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ''चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil)  यांनी आतापर्यंत अनेकवेळा हे सरकार जाईल असं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याने हे सरकारला काही फरक पडत नाही. हे सरकार पुढील अनेक वर्षे टिकेल'', असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना झटके येत असतीलविशेष म्हणजे, आजच्या दिवशी दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यावरुनही राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. संजय राऊत म्हणाले, ''पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे होत आहेत. बहूतेक त्याच शपथविधीचे झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत आणि म्हणून ते सारखं बोलत आहेत की, सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, इतकंच मी त्यांना सांगेल'', असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं ?एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांचीएसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे. एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे

राज्यातील वातावरण कोण आणि का भडकवत आहे, या मागील हेतू सर्वांना माहिती आहे. एसटी संपात तेल ओतण्याचे काम कोण करत आहे, हेही आम्हाला माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे. जे करता येणे शक्य आहे ते सरकार करत आहे. शरद पवारांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, हे मला समजले, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतST Strikeएसटी संपSharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील