Sanjay Raut, Sharad Pawar: "शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; Devendra Fadnavis यांच्या दाव्यानंतर संजय राऊत मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:01 PM2023-02-14T13:01:51+5:302023-02-14T13:04:19+5:30

फडणवीस-अजितदादा यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलंय

Sanjay Raut supports Sharad Pawar and slammed Devendra Fadnavis over Ajit Pawar oath taking | Sanjay Raut, Sharad Pawar: "शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; Devendra Fadnavis यांच्या दाव्यानंतर संजय राऊत मैदानात

Sanjay Raut, Sharad Pawar: "शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; Devendra Fadnavis यांच्या दाव्यानंतर संजय राऊत मैदानात

googlenewsNext

Sanjay Raut on Sharad Pawar vs Devendra Fadnavis: “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला सुमारे अडीच-तीन वर्षे झाली. शरद पवार यांचा त्यात काहीच संबंध नाही हे आम्ही विश्वासाने सांगतो. जर शरद पवारांना अशा काही गोष्टीची कल्पना असती किंवा त्यांनी ते कांड केले असते तर सरकार पाच वर्ष टिकले असते. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही आमदार भाजपाला फोडता आला नाही. भाजपाने सर्वात आधी शिवसेनेशी विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवार जर तुमच्या षडयंत्रात सामील असते, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने पाच वर्ष पूर्ण केले असते. शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के आहेत. ते नेहमी हाती घेतलेले काम पूर्ण करतात”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शरद पवारांवर असलेल्या विश्वासाचा पुनरूच्चार केला.

“अडीच वर्षांनंतरही देवेंद्र फडणवीस तेच सकाळचे स्वप्न पाहत आहेत. अजूनही ते झोपेतून उठले नाहीत. शपथविधी सोहळा होतोय, ते मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, असे स्वप्न कधीपर्यंत पाहणार? हे दळण आणखी किती काळ दळत राहणार?”, असा खोचक टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला.

शिंदे गटावरही केली टीका

“असं काही ठरलं नव्हतं, हे बोलण्याची हिंमत करु नका. असंच ठरलं होतं. हे तुमच्या तोंडून निघालेलं होतं. हॉटेल ब्लू सी मधील तुमचं वक्तव्य तुम्हीच तपासून पाहा. तुम्ही एक नंबरचे खोटारडे लोक आहेत. त्यांचा खोटारडेपणा आम्ही रोज उघड करु. जर असं काही ठरलं नव्हतं. तर मग उद्धव ठाकरेंना दिलेला वायदा मिंधे गटाच्या टेस्ट ट्यूब बेबी सोबत का पूर्ण केला जातोय. त्यांना मांडीवर बसवून त्यांचा पाळणा का हलवला जातोय. आता म्हणत आहात, आम्ही शिवसेनेशी युती केली, मग आम्ही कोण होतो?”, असा सवाल संजय राऊतांनी केला.

Web Title: Sanjay Raut supports Sharad Pawar and slammed Devendra Fadnavis over Ajit Pawar oath taking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.