संजय राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवारांची उडवली खिल्ली; देवेंद्र फडणवीसांवरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 11:28 AM2023-10-07T11:28:51+5:302023-10-07T11:29:54+5:30

५०-५० खोके आले कुठून? साताऱ्यात दरेगावात झाडे लागली आहेत का? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

Sanjay Raut target Eknath Shinde-Ajit Pawar; It also Devendra Fadnavis | संजय राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवारांची उडवली खिल्ली; देवेंद्र फडणवीसांवरही बरसले

संजय राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवारांची उडवली खिल्ली; देवेंद्र फडणवीसांवरही बरसले

googlenewsNext

मुंबई – राज्य सरकारची नाडी दिल्लीत आहे. ते कधीही खेचतात, ओढतात त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पळत पळत दिल्लीत जातात. इथं सरकारी रुग्णालयात लोकं मरतायेत, गेल्या ८ दिवसांत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. नागपूर, नांदेड, छ.संभाजीनगर इथं रुग्ण मृत्यूमुखी पडलेत. जितके लोक नक्षलवादी हल्ल्यात गेले नाहीत तितके शासकीय रुग्णालयात मेलेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शासकीय रुग्णालयातील मृत्यूची जबाबदारी सरकारची नाही का? कधी विचारावं तेव्हा मुख्यमंत्री कुठे आहेत तर दिल्लीत गेलेत, अमित शाहांना भेटायला गेलेत. मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात बसलेत. इथे कोण आहे? सरकार कोण चालवणार? या मृत्यूला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस मदारी आहे आणि २ माकडं नाचयातेत. त्यांच्या हातात काय आहे? सरकारची नाडी दिल्लीला आहे त्यामुळे सारखे दिल्लीत जातात असं त्यांनी सांगितले.

तर महाराष्ट्रातील सरकार हे ना एकनाथ शिंदे, ना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आणलंय, हे सरकार दिल्लीतून ईडीने आणले आहे. सीबीआयने, इन्कम टॅक्सने आणले आहे. अजित पवार का पळून गेले हे शरद पवारांनी सांगितले. घाबरून पळाले ते. मुख्यमंत्री रात्री १२ वाजता शाहांना भेटायला जातात. नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुख्यमंत्री मुंबईत लावतात. ही वेळ तुमच्यावर आली आहे. भाजपा नेत्याच्या स्वागताचे बोर्ड आपण लावताय. तुम्ही स्वत:ला शिवसेना म्हणवता मग हे कुठून आले? हा चायना मेड माल आहे, चायनाची शिवसेना आहे अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली.

दरम्यान, एकनाथ शिंदेंना ईडी, सीबीआयने फोडलं आहे. देवेंद्र फडणवीस डमरु वाजवतायेत आणि २ माकडे नाचताय. ५०-५० खोके आले कुठून? साताऱ्यात दरेगावात झाडे लागली आहेत का? महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अत्यंत बिकट आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कोरोना काळात महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा उत्तमप्रकारे सांभाळली, जगाने त्याची दखल घेतली. तुम्ही आम्हाला काय सांगताय असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

भाजपानं ज्यांच्यावर आरोप केले ते आज उच्च पदावर

राहुल कुल ५०० कोटींचे मनी लॉन्ड्रिंग, दादा भुसे यांच्यावर आरोप आहेत. हसन मुश्रीफांना जेलमध्ये पाठवणार होते, पण ते मंत्रिमंडळात गेले. अनेकांवर आरोप आहेत. मुश्रीफांना जेलमध्ये भाजपावालेच टाकायला गेले होते, हायकोर्टाचे ताशेरे ओढले आहेत. भाजपा नेत्याने ज्याच्यावर आरोप केले ते सगळे भाजपा सरकारमध्ये उच्च पदावर आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.

 

Web Title: Sanjay Raut target Eknath Shinde-Ajit Pawar; It also Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.