शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

संजय राऊतांना अटक ही तर 'श्रींची' इच्छा; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 4:43 PM

Sudhir Mungantiwar : संजय राऊत यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले आहे. संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

मुंबई :  मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले आहे. संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी कधीही वंचितांचे- बेरोजगारांचे- शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत असल्याचे मुनगंटीवार यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे अडीच वर्ष खलनायकी भूमिकेत होते. त्यांनी कधीही वंचितांचे प्रश्न मांडले नाहीत. त्याऐवजी आमदारांना रेडे म्हणत महिलेलाही अपशब्द वापरले. 70 सेकंदात 70 शिव्या देण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत, असा भाव संजय राऊतांना होता. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत आहेत. कधी पत्रा चाळवासीयांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. याशिवाय, मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी मेट्रो महत्त्वाची होती. ती देखील त्यांनी अडवली. सरकारी वकिलाकरवी कट रचून विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक ही तर श्रींची इच्छा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडीदरम्यान, संजय राऊतांना अटक केल्यानंतर आज त्यांना सत्र न्यायालयात हजर केले. कोर्ट रूम नंबर १६ मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीने रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केले. जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर ईडीच्यावतीने हितेन वेणेगावकर यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSanjay Rautसंजय राऊत