नाशिक : तुर्कस्थान येथे सुरू असलेल्या एशियन इनडोअर स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने तीन हजार मीटरमध्ये ‘सिल्वर’ पदक मिळविले. संजीवनीचे हे आंतरराष्टÑीय स्तरावरील तीसरे पदक आहे.संजीवनी जाधव हिने सातत्यपूर्ण कामगिरी करीत एशियन, वर्ल्ड युनिव्हर्सिटी आणि आता तुर्कस्थान येथे सुरू असलेल्या ‘एशियन इनडोअर’मध्येही चमकदार कामगिरी करत रजत पदक मिळविले. यापुर्वी तिने एशियन स्पर्धेत दहा हजार मीटरमध्ये ब्रांझ तर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत पाच हजार मीटरमध्ये सिल्वर पदक मिळविले आहे. नुकतीच तिची २०२०मध्ये टोकियोला होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेच्या संभाव्य खेळाडूंमध्ये निवड झाल्यानंतर कारकि र्दीतील तीसरे आंतरराष्ट्रीय पदकही तीने सोमवारी (दि.१८) मिळविले. या विजयामुळे तीचा आत्मविश्वास अधिकच उंचावला आहे. तीन महिन्यांत सलग तीन आंतरराष्ट्रीय पदक मिळविण्याचा पराक्रमही संजीवनीने आपल्या नावावर नोंदविला आहे.
आता लक्ष्य टोकिओ : आॅलिम्पिकपर्यंत केंद्राकडून प्रशिक्षण
२०२० मध्ये टोकिओ येथे होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेपर्यंत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिची संभाव्य खेळाडूंमध्ये टॉप्स योजनेत निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘इलाइट अॅथेलिट आयडेन्टीफीकेशन कमिटी’ने जाहीर केलेल्या देशभरातील २० धावपटूंच्या यादीमध्ये संजीवनीच्या नावाचा समावेश आहे. या यादीनुसार आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याची क्षमता असणाºया खेळाडूंची निवड केली जाते. यापूर्वी २०१६ मध्ये कविता राऊत भारतासाठी आॅलिम्पिक स्पर्धा खेळली होती. संजीवनी प्रत्यक्ष मैदानात उतरली, तर ती कविता नंतर नाशिकची दुसरी आॅलिम्पिकपटू ठरेल.जगभरातील खेळाडूंसाठी क्रीडा पंढरी म्हणून ओळख असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेचे दार संजीवनीसाठी उघडले असल्याने नाशिककसाठी ही भूषणावह बाब ठरली आहे. संजीवनी हिने हंगामातील उत्कृष्ट कामगिरी करताना केंद्र सरकारच्या समितीचे लक्ष वेधून घेतले होते. देशासाठी आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवून घेण्याची धमक असलेल्या विविध खेळांतील सुमारे १५२ खेळाडूंची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यामध्ये अॅथेलेटिक्सच्या २० खेळाडूंची नावे निवडण्यात आली. त्यामध्ये १५व्या क्रमांकावर संजीवनी जाधवच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. संजीवनीची एकूणच कामगिरी पाहता देशासाठी ती नक्की आॅलिम्पिक खेळू शकेल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी अनेकदा व्यक्त केला होता. त्यांचा हा विश्वास यामुळे सार्थ ठरला आहे. संजीवनीने नुकतेच एशियन स्पर्धेत ब्राँज पदक पटकाविले आहे, तर जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धेतही तिने सिल्व्हर पदक पटकाविले आहे. सध्या ती तुर्किस्तान येथे असून एशियन इंनडोअर स्पर्धा खेळत आहे.