शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
5
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
6
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
7
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
8
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
9
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
10
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
11
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
12
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
13
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
14
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
15
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
16
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
17
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
18
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
19
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
20
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

संकेत बावनकुळेंनी खरंच बीफ खाल्ले का?; संजय राऊतांच्या दाव्यावर पोलिसांकडून महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 5:37 PM

Nagpur Hit and Run Case : नागपूरमधील ऑडी कार हिट अॅण्ड रन प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेंनी गोमांस खाल्ले होते, असा आरोप केला. राऊतांनी केलेल्या आरोपानंतर नागपूर पोलिसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

Sanket Bawankule hit And run : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुलगा संकेत बावनकुळेंमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नागपुरमध्ये ज्या ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली, तिच्या संकेत बावकुळे होते, समोर आले आहे. त्यानंतर संकेत बावनकुळेंनी बीफ खाल्ल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. ला होरी बार बिलाचा  हवाला देत राऊतांनी हा दावा केला होता. त्यावर आता नागपूरपोलिसांकडून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आला आहे. 

खासदार संजय राऊत यांनी नागपुरातील हिटअॅण्ड रन प्रकरणावरून पुन्हा लक्ष्य केले. राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेंनी लाहोरी बारमध्ये बीफ खाल्ले, असेही ते म्हणाले. पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. 

संकेत बावनकुळे बीफ खाल्ले? पोलीस म्हणाले... 

नागपूरचे पोलीस उपायुक्त (झोन २) राहुल मदने यांनी बीफ खाल्ल्या आरोप फेटाळले आहेत. राहुल मदने म्हणाले, "आम्हाला बिल मिळाले आहे. त्यातून ही गोष्ट स्पष्ट होते की, त्यांना गोमांस दिले गेले नव्हते." 

संकेत बावनकुळेंनी नेमके काय काय खाल्ले?

बिलाबद्दल नागपूर पोलीस दलातील दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "संकेत आणि त्याचे चार मित्र शहरातील धरमपेठ परिसरात असलेल्या लाहोरी बारमध्ये गेले होते. तिथे त्यांनी मटन रोस्ट, मटन करी, चिकन टिक्का यासोबतच मसाला मूंगफली आणि काजू फ्राय आदी पदार्थ मागवले होते आणि खाल्ले. त्यांनी १२००० रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या दोन मद्याच्या बॉटल मागवल्या होत्या."

संजय राऊत यांनी काय केला होता आरोप?

खासदार संजय राऊत आरोप करताना म्हणालेले की, "त्या गाडीमध्ये लाहोरी बारचे बिल मिळाले. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे बिल समोर आणले पाहिजे. त्यात दारूचे बिल आहे. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात. चिकन, मटण याच्यासोबत बीफ कटलेटचेही बिल आहे. गोमांस... श्रावण आहे, गणपती आहेत. आम्हाला हिंदुत्व शिकवतात. पोलिसांनी बिल जप्त केले आहे. तुम्ही बीफ खायचे आणि लोकांचे बळी घ्यायचे", अशी टीका संजय राऊतांनी केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSanjay Rautसंजय राऊतnagpurनागपूरPoliceपोलिसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस