शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

लया जाई क्षीण भार..पावले चालती पांडुरंग होऊनिया..! संत ज्ञानेश्वरांची पालखी वाल्हे मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 8:34 PM

माऊलींच्या पालखीचा जेजुरी ते वाल्हे हा मार्ग सगळ्यात जवळचा म्हणजेच एकूण बारा किलोमीटरचा असल्याने पालखी दुपारीच पालखी स्थळावर पोचवली.. 

ठळक मुद्देवैष्णवांच्या शिस्तीचे दर्शन: दुपारीच पालखी पोहचली मुक्कामीसमाज आरती होऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन सुरूशासनाने वाटप केलेले रेनकोट घातलेले वारकरी

अमोल अवचिते 

वाल्हे:  कारणे पंढरपूर हो वारी !            आनंदी सोहळा  संसारी !            गजर नाम कृष्णहरी !            परब्रम्ह भेट !!  येळकोट येळकोट, जय मल्हार, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ भगवान की जय अशा जय घोषात जेजुरीचा मुक्काम उरकून वाल्हेकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी निघाली. वाल्हे येथे दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मुक्कामाला विसावली. दुपारी होणाऱ्या समाज आरतीसाठी मोठ्या संख्येने वैष्णवजन पालखी स्थळावर आले होते.   माऊलींच्या पालखीचा जेजुरी ते वाल्हे हा मार्ग सगळ्यात जवळचा म्हणजेच एकूण बारा किलोमीटरचा असल्याने पालखी दुपारीच पालखी स्थळावर पोचवली.    दुपारीच माऊलींची पालखी स्थळावर पोहचल्याने समाज आरतीसाठी स्थानिक  भक्तांनी आणि वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या. टाळकरी, मृदुंगवादक, वारकरी पालखी स्थळावर गोलाकार बसले होते. आरती होण्यापूर्वी माऊलींच्या चोपदाराने दंडक वर केल्यानंतर सर्वत्र शांतता पसरली. यावरून शिस्तीचे उत्तम उदाहरण दिसून आले. शांतता पसरल्यानंतर पुढील नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर समाज आरती होऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन सुरू झाले.   डोंगरातील हिरळवलीने नटलेल्या दौंडज खिंडीत न्याहारीसाठी पालखी थांबली होती. त्याचवेळी पावसाच्या हलक्यासरी कोसळत होत्या. वारकरी ठिकठिकाणी बसले असता खिंड मोहक दिसत होती.    पाऊस पडत असला तरी हरिनामाच्या गजरात खिंडीत पालखीची वाटचाल अभंगात लीन होऊन शिस्तीत चालली होती.    वाहतुक नियमाचे उत्तम उदाहरण यावेळी या मार्गावर दिसून आले. पोलिसांनी सर्वांना समान नियम लावल्यामुळेच वाहतुक सुरळीत सुरू होती. असे एका वारकऱ्यांने सांगितले. पाऊस पडत असताना शासनाने वाटप केलेले रेनकोट वारकऱ्यांनी घातलेले दिसून आले. पालखी वाल्हे मुक्कामी असल्यामुळे राहुट्या उभारल्या जात  होत्या. सेवेकरी जेवणाची व्यवस्था पाहत होते. अनेक ठिकणी दुपारी जेवणासाठी पिठलं भाकरी करण्यात आली होती. शासनाकडून शिस्तबध नियोजन करण्यात आले होते. 

वाटमारी करणारा ते महाकाव्य लिहिणारा महाकवीपुरातन काळी वाल्ह्या कोळी वाल्हे याठिकाणी राहून वाटसरूंना मारत असे. त्याच्या नावावरून या भागाला वाल्हे हे नाव पडले. या गावाच्या उत्तरेस सात डोंगर दिसतात.ते वाल्ह्या कोळयाचे रांजण असल्याचे सांगितले जाते. वाटमारी करत असताना वाल्ह्याला नारदमुनींचा अनुग्रह झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. त्यानेच पुढे रामायण हे महाकाव्य लिहीले. मंगळवारी (आज) वाल्हेतुन सकाळी पालखी लोणंदला निघणार आहे. या मार्गात नीरा नदीवर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी