शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 8:34 AM

तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; राज्यभरातील दिंड्या दाखल

देहूगाव (जि. पुणे) : वरुणराजाच्या अभिषेकात टाळ-मृदंगाचा कल्लोळ, विणेचा झंकार झाला आणि आषाढी वारीसाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र देहू येथून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या वैष्णवांच्या बीजमंत्राने इंद्रायणी नदीकाठची देहूनगरी विठ्ठलमय झाली. 

पालखीच्या सुखसोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दिंड्या आणि वारकरी देहूमध्ये गुरुवारी सायंकाळीच दाखल झाले होते. हरिभजन, कीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. शुक्रवारी पहाटे वारकऱ्यांनी इंद्रायणी स्नान केले. पहाटे पाचला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शीळा मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर साडेसहाला पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधीची व सात वाजता वैकुंठगमन मंदिरात महापूजा झाली. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवला होता. 

माउलींच्या पालखीचे आज प्रस्थानआळंदी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माउलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीनिमित्त संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. माउलींच्या आषाढी पायी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. प्रस्थानानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात मंदिर व शहर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर, आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर माउलींच्या पालखीचा पहिला मुक्काम होईल.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा