शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, विठ्ठल नगरी दुमदुमली

By admin | Published: July 03, 2017 6:21 PM

देहू-आळंदीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत वाखरी मुक्कामी थांबलेला लाखो भक्तांचा मेळा टाळ मृदंगाच्या गजरात पंढरीच्या भक्तीसागरात सामील झाला.

शहाजी फुरडे-पाटील/ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 3 - अनंत तीर्थाचे माहेर असलेल्यापंढरीत कमरेवर हाथ ठेऊन भक्ताची वाट पाहत असलेल्या विठुरायाच्या भेटीसाठी देहू-आळंदीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत वाखरी मुक्कामी थांबलेला लाखो भक्तांचा मेळा टाळ मृदंगाच्या गजरात पंढरीच्या भक्तीसागरात सामील झाला. पालख्यांचे शहरात आगमन झाल्याने पंढतीत सर्वत्र भक्तीला उधाण आले आहे.सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे संत ज्ञानोबा माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. संत मुक्ताबाई व संत गजानन महाराज यांच्या पालख्या नवमीलाच पंढरपूरात दाखल झाल्या होत्या.पालखी मार्गाने  येऊन वाखरी तळावर मुक्कामी थांबलेल्या संतांना नेण्यासाठी मुक्ताबाई संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांच्यासह छोट्या मोठ्या पालख्या वाखरीकडे  माऊली आणि तुकोबांचे नेण्यासाठी आल्या होत्या. वाखरी तळावर सर्व पालख्या असल्याने रात्रभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी1 वाजता पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या.या मार्गावर सर्वात पुढे नामदेव ,मुक्ताबाई,सोपान काका, निवृत्तीनाथ,  त्यानंतर एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज व सर्वात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज या क्रमाने पालख्या पंढरपूरकडे निघाल्या.रस्त्याच्या दुतर्फा वारकरी भजनात तल्लीन होऊन झपाझप पावले टाकत होता.या मार्गावर पाहावे तिकडे वारकरीच दिसत होते.गर्दीमुळे अतिशय संथ गतीने हे सोहळे चालत होते. विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिर विसावा जवळ माऊली आणि संत तुकोबांचे उभे रिंगण पार पडले.अश्वानी दोन फेऱ्या रथाच्या पाठीमागे पर्यंत जाऊन पूर्ण केल्या.रिंगणानंतर दिंड्यातील वारकऱ्यांनी फुगड्या, मनोरे आदी खेळ खेळत असताना रंग पंचमीप्रमाणे वारकरी एकमेकांना  अंगावर पाणी टाकून बुक्का, गुलाल, अष्टगंध लावत होते. पंढरी समीप आल्याने वारकरी आनंदी होते. आरती म्हटल्या नंतर सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झालं.वाटेत नगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

गेल्या सतरा दिवसापासून या पालखी सोहळ्यात लहान थोर, आबालवृद्ध,केवळ पांडुरंगाच्या भेटीसाठी चालत होते हा सर्व वारकऱ्यांचा मेळा रात्री पंढरपुरात दाखल झाला. त्यामुळे पंढरी दुमदुमून गेली होती. माऊलींची पालखी प्रदक्षिणा मार्गे समाधी मंदिरात विसावली तर तुकाराम महाराज यांची ही याच मार्गे येऊन तुकाराम मंदिरात चार दिवसाच्या मुक्कामासाठी थांबली. एकनाथ महाराजां ची नाथ चौकात, थांबणार आहे.सर्व संताच्या पालख्या आपापल्या मठात थांबल्या आहेत.तुकोबांसमोर दैठणकरांचे तर माऊली समोर देहूकरांची कीर्तन सेवारविवारी तुकोबांसमोर ठाकुरबुवा दैठणकर यांचे कीर्तन  तर नवी पेठ विठ्ठल मंदिर  दिंडी पुणे या 115 वर्षाच्या जुन्या दिंडीचा जागर झाला. तर परंपरे प्रमाणे माऊलींसमोर देहूकरांच्या वतीने संभाजी महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले.आज नगर प्रदक्षिणा सर्व संतांच्या पालख्यासह विविध दिंड्यातील वारकरी चंद्रभागेत स्नान करून, टाळ मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यानंतर अनेक वारकरी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात.दिंडीतील विणेकऱ्यांचा नारळ व शेंगा देऊन सत्कारसंत तुकारामांचा सोहळा मंदिरात पोहचल्या सर्व दिंड्यातील विणेकऱ्याना मानाचा नारळ प्रसाद व दुसऱ्या दिवशीच्या एकादशी मुळे भुईमुगाच्या शेंगा देऊन सत्कार देहू संस्थान चे अध्यक्ष बाळासाहेब मोरे सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.यंदा कोरडी वारी, पाऊसच नाहीयंदा सोहळ्याचे देहूहून प्रस्थान झाल्यापासून केवळ रोटी घाटातील किरकोळ अपवाद वगळता वाटचालीत कोठेही पाऊस पडला नाही त्यामुळे यंदाची वारी ही कोरडीच झाली.त्यामुळे वारकरी पांडुरंगाला केवळ चांगला पाऊस पडू दे असे साकडे घालत होता.