शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वडिलांच्या त्रासाला कंटाळून भावंडांनी घेतले विष; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 9:09 PM

गेवराई तालुक्यातील काठोडा येथे दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून दोन भावंडांनी विषारी द्रव प्राशन केले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी समोर आली.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. २३ - गेवराई तालुक्यातील काठोडा येथे दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून दोन भावंडांनी विषारी द्रव प्राशन केले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी समोर आली.स्वाभिमान अर्जुन गणकवार (१९) असे मयताचे नाव असून, धम्मपाल अर्जुन गणकवार (वय १६) याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की, अर्जुन गणकवार हे मोलमजुरी करुन कुटुंब उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले असून, पैकी स्वाभिमान व धम्मपाल यांनी सोमवारी दुपारी टोकाचे पाऊल उचलत विषारी द्रव प्राशन केले. अर्जुन गणकवार यांना दारुचे व्यसन असून, ते दारू पिऊन आईला मारहाण करीत. त्यामुळे या दोघांनी त्यांना जाब विचारला. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही मुलांनी अर्जुन यांना चोप दिला. याचा राग मनात धरुन अर्जुन यांनी आपल्या भावाच्या मदतीने दोन्ही मुलांना मारहाण केली होती. दोघांनी विषारी द्रव प्राशन केल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. स्वाभिमानने मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. धम्मपाल मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा ठाण्यात नोंद झाली नव्हती.