मुंबई : सरकारी विधि महाविद्यालयाच्या तिसºया व पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आणखी एक तुकडी वाढवावी, अशी विनंती करणारी याचिका एका वकिलाने उच्च न्यायालयात केली आहे.सरकारने व विद्यापीठाने सरकारी विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षमता कमी केली आहे. यापूर्वी एलएलबीसाठी २४० जागा ठेवण्यात आल्या होत्या. आता ही क्षमता १८० इतकी करण्यात आली. तर पाच वर्षांच्या एलएलएमसाठी १२० जागा ठेवण्यात आल्या आहेत. जागेअभावी अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागू नये, यासाठी विधि महाविद्यालयाने राज्य सरकार व विद्यापीठाकडे निवेदन केले आहे. किमान २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी तरी जागा वाढवून द्याव्यात, अशी विनंती महाविद्यालयाने सरकारकडे केली आहे. मात्र राज्य सरकार व विद्यापीठाने काहीही निर्णय न घेतल्याने व्यवसायाने वकील असलेल्या नवीन चोमल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत सरकारने १७ मे रोजी सरकारी विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थी क्षमतेवर घातलेल्या निर्बंधावर स्थगिती द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
सरकारी लॉ कॉलेजमध्ये जागा वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:08 AM