ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि. 28 - मराठी चिञपट सृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सैराट या चित्रपटातील सल्ल्याने आज बारावी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर दिला.
गेल्या वर्षी करमाळा तालुक्यात चित्रित झालेला व मराठी सिने जगतात कोटीच्या कोटी उड्डाने पार करणा-या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटात नायक परशा चा मिञ सहकलाकार सल्ल्या उर्फ अरबाज शेख करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत कनिष्ठ महाविद्यालयात बारावी च्या वर्गात कला शाखेत शिक्षण घेत आहे. आज पासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे.सल्ल्या ने आज जेऊर च्या भारत महाविद्यालयाच्या केंद्रात परीक्षा दिली.
सैराट चिञपट प्रदर्शित होऊन वर्ष होत आहे तरी ही या चित्रपटाची लोकप्रियता व त्यामध्ये भूमिका केलेल्या सर्वच कलाकारांनी केलेल्या भूमिकेची आज ही प्रेक्षकांमध्ये चर्चा होताना दिसते. सैराट चित्रपटाचे चित्रिकरण करमाळा, केम, कंदर, शेलगाव-वां, देवळाली, श्रीदेवीचामाळ या भागात झाले आहे. चित्रिकरण झालेल्या या स्थळांना आज ही राज्यभरातील प्रेक्षक भेटी देऊन पर्यटनाचा आनंद घेत आहेत. सैराट चित्रपट कन्नड भाषेत तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, बारावी परीक्षा पास होणे जीवनात महत्वाचे असून परीक्षेपूर्वी मी चांगला अभ्यास केला आहे. बारावीनंतर नाट्य चित्रपट कलेचे शिक्षण घेणार आहे, असे सल्ल्या उर्फ अरबाज शेख याने सांगितले.