शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

देशातील महापालिकांच्या सारथ्यासाठी ‘सारथी’ सज्ज

By admin | Published: September 04, 2016 1:12 AM

महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान, तसेच पारदर्शी व्हावा, नागरी सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सहज मिळावी, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने

-  संजय माने,  पिंपरी-चिंचवड

महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान, तसेच पारदर्शी व्हावा, नागरी सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सहज मिळावी, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली. देशातील सर्व महापालिकांमध्ये ‘सारथी’ उपक्रम राबवावा, असे आदेश केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे देशातील महापालिकांसाठी हा प्रकल्प सारथ्य करणार आहे. नळजोडसाठी अर्ज कोठे करायचा? बांधकाम परवाना कसा मिळेल? मिळकतकर कोठे भरायचा? असे नागरी सुविधांसंबंधीचे विविध प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतात. त्याची तत्काळ उत्तरे मिळणारी सारथी हेल्पलाइन सुविधा पिंपरी-चिंचवडकरांसाठी प्रभावी सोल्युशन यंत्रणा ठरली. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेला सारथी उपक्रम प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सेतू बनला आहे.ई-गव्हर्नन्सचा अवलंब करून महापालिकेची विविध कार्यालये संगणकीकरणाने जोडून प्रशासकीय कामकाज गतिमान केले.त्यानंतर नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्याची यंत्रणा कार्यान्वित केली. २१९ महापालिकांमध्ये ‘सारथी’ होणार कार्यान्वित पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून, त्यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये साकारलेल्या सारथी प्र्रकल्पाचे सादरीकरण केंद्रीय नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा, सहसचिव नीरज मंडलोई यांच्यासमोर झाले. परदेशी यांनी सादरीकरण केलेला सारथी प्रकल्प आवडल्याने केंद्रीय नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव एमपीएस दारा यांनी सर्व राज्याच्या प्रधान सचिवांना सारथी प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले. २२ आॅगस्ट २०१६ला दिलेल्या या आदेशामुळे देशातील २१९ महापालिकांमध्ये हा प्रकल्प राबविण्याची प्रकिया सुरू होणार आहे. मोबाइल अ‍ॅपद्वारे सेवा...मोबाइल अ‍ॅप्स अ‍ॅप्लिकेशनद्वारे महापालिकेशी संबंधित कामे नागरिक घरबसल्या करू शकतील. अशा स्वरूपाचे ‘मोबाइल अ‍ॅप्स’ पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केले असून, मोबाइलच्या क्लिकवर त्यांना सहज माहिती मिळणार आहे. हे या महापालिकेने लोकाभिमुख सेवेसाठी उचललेले पुढचे पाऊल आहे.