शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 10, 12 वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; 69,100 रुपये पगार

By हेमंत बावकर | Published: October 13, 2020 9:55 AM

Post Office Recruitment 2020 (Maharashtra Postal Circle Vacancy) पोस्ट खात्यात नोकरी हवी असेल तर मराठीची जाण असणे, लिहिता-बोलता येणे गरजेचे आहे. यासाठी एक चाचणी देखील होणार आहे.

Post Office Recruitment 2020 (Maharashtra Postal Circle Vacancy): पोस्ट खात्यात तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय पोस्ट खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 1371 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छूक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. 

पोस्टातील या जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 10 नोव्हेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. ती वाढवून 10 नोव्हेंबर करण्यात आली आहे. 

योग्यता - 

  • पोस्टमन आणि मेल गार्डच्या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 12 वी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची स्थानिक भाषा मराठी असणे बंधनकारक आहे. तसेच त्याला मराठीची चांगली माहिती असणे गरजेचे आहे. 
  • मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी पास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. या भरतीमध्ये कॉम्प्युटर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. यावरून उमेदवार निवडले जाणार आहेत. 

पगार पोस्टमन आणि मेलगार्ड पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला तीन श्रेणींमध्ये पगार दिला जाणार आहे. हा पगार 21700 रुपये ते 69100 रुपये असणार आहे. तर मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) साठी पगार लेव्हल १ नुसार देण्यात येणार आहे. हा पगार 18,000 ते 56,900 रुपये असणार आहे. 

पदांचे विवरण पोस्टमन- 1029 पदे मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)- 327 पदेमेलगार्ड- 15 पदे

वयाची अट : तिन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे असायला हवे. 3 नोव्हेंबर 2020 रोजीचे वय गृहीत धरले जाणार आहे. 

शुल्क UR/OBC/EWS वर्गाच्या उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर SC/ST/PWD आणि महिला वर्गासाठी केवळ 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...ऑनलाईन अर्जासाठी इथे क्लिक करा... 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसgovernment jobs updateसरकारी नोकरीMaharashtraमहाराष्ट्र