शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
2
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
3
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
4
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
5
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
6
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
7
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
8
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
9
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
10
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
11
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
12
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
13
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
14
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
15
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
16
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
17
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
18
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
19
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
20
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला

सरपंचांना सहा वर्षे टाकले वाळीत

By admin | Published: January 29, 2015 5:40 AM

म्हसळा तालुक्यातील कोळे ग्रामपंचायत निवडणुकीत कुणबी जातपंचायतीचा विरोध डावलून निवडणूक लढवली म्हणून सहा वर्षे वाळीत टाकल्याप्रकरणी

जयंत धुळप, अलिबाग म्हसळा तालुक्यातील कोळे ग्रामपंचायत निवडणुकीत कुणबी जातपंचायतीचा विरोध डावलून निवडणूक लढवली म्हणून सहा वर्षे वाळीत टाकल्याप्रकरणी कोळे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल शंकर पेंढारी यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी कुणबी जातपंचायतीच्या ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अमोल पेंढारी यांनी फेब्रुवारी २००९ मध्ये कोळे ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कोळे गाव कुणबी जातापंचायातीने त्यांना विरोध केला. विरोध डावलून अमोल पेंढारी यांनी निवडणूक लढवली आणि ते सरपंच म्हणून निवडणूनही आले. याच गोष्टीचा राग धरून अमोल पेंढारी व त्यांच्या कुटुंबावर फेब्रुवारी २००९ पासून कोळे गाव कुणबी जातापंचायातीच्या मुंबई व स्थानिक ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला.कोळे गावातील अन्य ग्रामस्थांनीही पेंढारी यांच्या कुटुंबीयांशी संबंध ठेवू नये, तसेच संबंध ठेवल्यास त्यांनाही वाळीत टाकू, अशी धमकी सर्व ग्रामस्थांना देण्यात आल्याचे अमोल पेंढारी यांनी सांगितले. पेंढारी व त्यांच्या कुटुंबीयांना समाजात पुन्हा सामील करून घेण्यासाठी २० आॅक्टोबर २०१३ रोजी म्हसळा तालुका कुणबी समाज मुख्य न्यायदान कमिटीच्या सभेमध्ये कोळे जातपंचायतीने ठराव केला. अमोल पेंडारी यांच्यावर दबाव आणून, जबरदस्तीने १० हजार रुपये दंड मागितला. तर मागील पाच वर्षांची वर्गणी ९ हजार ५२० रुपये असे एकूण १९ हजार ५२० रुपये वसूल केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.