- आशिष देरकर
कोरपना (जि. चंद्रपूर) : स्वनिधी व १५ वा वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील विजेच्या दिव्यांचे बिल भरण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. तूर्तास ग्रामपंचायतींनी पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू बिलाचा भरणा स्वनिधीतून करावा. त्यासंदर्भात काही दिरंगाई झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना वित्त नियंत्रक प्रवीण जैन यांनी केल्या आहेत.
स्वनिधीत ठणठणाट२०२० व २०२१ या दोन्हीवर्षी ऐन मार्चमध्ये कोरोनाने डोके वर काढल्याने संचारबंदीमुळे ग्रामपंचायतींची करवसुली होऊ शकली नाही. ग्रामपंचायतींचे लाखो रुपये कर स्वरूपात थकित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या स्वनिधीमध्ये पैशांचा ठणठणाट आहे.