ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - हिंदू समाजानं उपेक्षा केल्यामुळे धर्मांतरण झाले असले, तरी जे आमचे होते, ते परत आमचे व्हावेत असे सांगत सरसंघटालक मोहन भागवतांनी घरवापसीचं समर्थन केलं. हिंदू समाज जागृत होत आहे, धर्मांतरण करून गेलेले परत येतील, त्यासाठी आणखी 20 ते 30 वर्षे लागतिल असेही भागवत म्हणाले. भागवतांनी मातंग समाजातील लोकांबरोबर येथे भोजनही केले. आरक्षणाच्या वक्तव्यावर खूप गोंधळ झाल्याचे सांगत या मुद्यावर आता काही बोलणार नसल्याचंही भागवत म्हणाले.
संघ सरकार चालवत नाही, सरकारच्या कामात लक्ष घालत नाही
सरकारच्या कामात संघ लक्ष घालत नाही आणि संघ सरकार चालवतही नाही असं भागवत म्हणाले. अर्थात, संघाचे सेवयंसेवकच देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आहेत, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. मातंग समाजाच्या प्रलंबित समस्यांबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सरकारला सांगू असे आश्वासन मोहन भागवत यांनी मातंग समाजाच्या प्रतिनिधींना दिले.
स्वातंत्र्यानंतर समाजातील विविध स्तरातील समाजांमधील दरी वाढली
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजामध्ये दरी वाढल्याचे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टच्या चिंचभवन येथील मातंग समाजाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी आपली मते व्यक्त केली. आपल्या देशातील कायदे आणि संविधान यांचे प्रामाणिकपणे पालन झाले तर देश जगातील सर्वोत्तम देश होईल अशी