शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

सरसंघचालक मोहन भागवत आज भुसावळमध्ये

By admin | Published: November 07, 2016 12:46 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे रविवारी रात्री ११.३० वाजता १२१०६ अप गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसने भुसावळात आगमन झाले

भुसावळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे रविवारी रात्री ११.३० वाजता १२१०६ अप गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसने भुसावळात आगमन झाले. त्यांच्या सुरक्षेसाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रचंड सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली होती. संपूर्ण रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप आले होते. गेल्या ४ नोव्हेंबरपासून शहरातील बियाणी मिलटरी स्कूलमध्ये सुरू असलेल्या  अखिल भारतीय शारीरीक वर्गासाठी   त्यांचे रविवारी रात्री ११़३० वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले़अप १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसच्या एच- १ या वातानुकूलित बोगीतून उतरल्यानंतर त्यांनी उपस्थिताना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. झेड प्लस सुरक्षे सोबत  त्यांचे खास  सुरक्षा रक्षक तैनात होते. रेल्वे स्थानकाबाहेर बंदोबस्तात डॉ.भागवत बाहेर पडले़ एम़एच़२० ए़वाय़९१७२ या खास वाहनात बसल्यानंतरही त्यांनी उपस्थिताना स्मितहास्य करीत दोन्ही हात जोडून नमस्कार  केला़ पोलीस संरक्षणात खास वाहनाने रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागातून डीआरएम कार्यालय, यावलरोड, जळगावरोडवरुन  नवोदय विद्यालय मार्गे रात्रीच ते बियाणी मिलटरी स्कूलमध्ये दाखल झाले.रेल्वे स्थानकावर व बाहेर प्रचंड सुरक्षाडॉ.मोहन भागवत येण्यापूर्वीच रेल्वे स्थानकाला सुरक्षा रक्षकांनी कडे केले होते़ रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी स्वतंत्र बंदोबस्त राखला होता. पोलीस उपअधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहरचे  निरीक्षक वसंत मोरे, पोलीस  निरीक्षक अशोक रत्नपारखी, निरीक्षक डी़बी़सरक यांच्यासह आरपीएफ,पोलीस आणि लोहमार्ग पोलीस असा सुमारे ३०० पोलिसांचा बंदोबस्त होता.श्वान पथकाची  मानवंदना स्वीकारलीडॉ.मोहन भागवत यांना आरपीएफच्या 'अमर' या श्वानाने आगमनप्रसंगी मानवंदना दिली़ त्यांनी ती स्वीकारली़ हॅण्डलर सपकाळे यांची याप्रसंगी उपस्थिती होती़वीजपुरवठा गुलडॉ.मोहन भागवत यांच्या आगमनापूर्वी  ११ वाजून १ मिनिटांनी रेल्वे स्थानकावरील वीजपुरवठा गुल झाला. तो अर्ध्या मिनीटात पूर्ववत झाला. भागवत रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेतून बाहेर पडत असतानाच ११़३५ वाजता पुन्हा वीज गुल झाली मात्र ती लागलीच आली.