शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

सरसंघचालक पाकिस्तानवर प्रहार करणार ?

By admin | Published: October 10, 2016 8:57 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.10 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आर्थिक सेवेचे १९७६ बॅचचे अधिकारी व अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे संरक्षक सत्यप्रकाश राय हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. सर्जिकल स्ट्राईकवरून देशातील राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संघाच्या गणवेशात फुलपॅन्टचा समावेश झाल्यानंतरचा हा पहिला विजयादशमी उत्सव राहणार आहे.हाफपॅन्ट ही संघाच्या गणवेशाची ओळख होती. या वर्षी संघाने गणवेशात बदल केला व हाफपॅन्टची जागा फुलपॅन्टनने घेतली. देशातील बऱ्याच भागात संघ स्वयंसेवक नव्या गणवेशात दिसून येत असले तरी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत अद्याप या गणवेशात दिसलेले नाहीत. विजयादशमी उत्सवात ते प्रथमच गणवेशाच्या फुलपॅन्टमध्ये दिसतील. स्वयंसेवकांचे पथसंचलनदेखील फुलपॅन्टमध्येच होणार आहे.