सातारा : राष्टÑीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरून दोन्ही राजेमध्ये सुरू झालेला वाद धुमश्चक्रीत परावर्तीत झाला. सातारा शहराच्या मध्यभागी असलेल्या जलमंदिर आणि सुरूची या दोन बंगल्यांच्या परिसरात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा सुरू झाला. वाहनांची तोडफोड सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार चर्चा सुरू झाली. त्यानंतर जमाव पांगला. दरम्यान, रात्री १ वाजता उदयनराजे व त्यांचे खंदे समर्थक सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. राडा अन् गोळीबाराची चर्चा पसरताच दोन्ही राजेंचे समर्थक रस्त्यावर आल्यामुळे सातारा शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ज्या कारणावरून राडा सुरू झाला त्या आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन बदलण्याचा निर्णय तूर्तास बाजूला ठेवण्यात आला आहे.
साताºयात दोन्ही राजे गटांत राडा--: हवेत गोळीबाराची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:15 AM
सातारा : राष्टÑीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरून दोन्ही राजेमध्ये सुरू झालेला वाद धुमश्चक्रीत परावर्तीत झाला. सातारा शहराच्या मध्यभागी असलेल्या जलमंदिर आणि सुरूची या दोन बंगल्यांच्या परिसरात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा सुरू झाला. वाहनांची तोडफोड सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. ...
ठळक मुद्देआनेवाडी टोलनाका व्यवस्थापन बदलण्याचा निर्णय तूर्तास बाजूला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार चर्चा