शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

सातारा हिल मॅरेथॉन’

By admin | Published: May 21, 2017 1:13 AM

ऐतिहासिक साताऱ्याची नवी ओळख

निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या आणि गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनेसुध्दा ज्याची दखल घेतली अशी ‘सातारा हिल मॅरेथॉन’ ही साताऱ्याची नवी ओळख होऊ लागली आहे. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि दरवर्षी सप्टेंबरमध्ये संपन्न होणाऱ्या या उपक्रमाने साताऱ्याचा झेंडा जागतिक स्तरावर डौलाने फडकवला आहे. स्वा तंत्र्यपूर्व काळापासून साताऱ्याने विविध क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. अर्थात पेन्शनरांचा गाव अशी ओळख असलेल्या साताऱ्याने अनेक नवनवीन संकल्पना निर्माण केल्या, रुजविल्या आणि समृध्दही केल्या. अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची जन्मभूमी, कर्मभूमी, कुलभूमी आणि निवासभूमी म्हणूस साताऱ्यास प्रदीर्घ परंपरा आहे. अगदी पुराणकथांमध्येही या अजिंक्यभूमीचा गौरवास्पद उल्लेख आढळून येतो. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, कृषी, व्यापार, शिक्षण, सहकार, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रांमध्ये स्वकर्तृत्वाने सातारी बाणा रुजविण्याचे काम अनेक दिग्गज सातारकरांनी केले आहे. मात्र ‘उपक्रम’ अर्थात ‘इव्हेंट’ म्हणून ‘पीएनबी मेटलाईफ सातारा हिल मॅरेथॉन’ने निर्माण केलेली परंपरा सलाम करावी अशीच आहे. साताऱ्यासारख्या निमशहरी भागात, फारशी साधनसुविधा उपलब्ध नसताना आणि दरवर्षी स्पर्धक संख्येची चढती भाजणी प्राप्त करून या स्पर्धेच्या संयोजकांनी अक्षरश: अवजड शिवधनुष्य पेलले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.सातारा हिल मॅरेथॉनचा इतिहास पाहता सन २०१२ मध्ये सातारा मॅरेथॉन असोसिएशनची स्थापना झाली. साताऱ्यातील सुप्रसिध्द वैद्यकीय व्यावसायिक संदीप काटे यांनी डॉ. चंद्रशेखर घोरपडे, सीए विठ्ठल जाधव, अ‍ॅड. कमलेश पिसाळ, सुजित जगधने, डॉ. प्रतापराव गोळे आदी मित्रमंडळींसमोर सातारा मॅरेथॉनची कल्पना मांडली. डॉ. काटे हैद्राबाद, दिल्ली, मुंबई इतकंच काय पण जिम कार्बेटच्या जंगली मॅरेथॉनमध्येही सहभागी झाले होते. कार्बेटच्या जंगलात जर मॅरेथॉन होऊ शकते तर साताऱ्यात का नाही?’ या विचाराने अक्षरश: पछाडलेल्या डॉ. काटे यांनी आपल्या मित्रमंडळींच्या गळी सातारा मॅरेथॉनची कल्पना उतरवली. वास्तविक त्यांच्याव्यतिरिक्त इतरांना मॅरेथॉन स्पर्धा काय असते? हे सुध्दा माहीत नव्हते. मात्र परस्परांच्या वैचारिक धारा जुळल्या आणि मॅरेथॉनच्या कल्पनेने जोर घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी, पोलिस प्रमुख के. एम. एम. प्रसन्ना या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन मार्गदर्शन दिले. ‘मॅरेथॉन म्हणजे केवळ रनिंग रेस नसते,’ हे समजून सांगत श्री. प्रसन्नासाहेबांनी त्यांची मुंबई मॅरेथॉनबाबतची अनुभवाची शिदोरी ‘शेअर’ केली. ‘टाईम चिप्स’चे महत्त्व विषद करत पोलिस परेड ग्राऊंडचा ‘होल्डींग एरिया’ ‘मॅरेथॉन’साठी उपलब्ध करून दिला. टेक्निकली सर्व माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी मॅरेथॉन मार्गाची दुरुस्ती तसेच अन्य प्रशासकीय पातळीवरील सहकार्य केले. एखादी कल्पना मांडणे, घोषणा करणे तसे सोपे असते. मात्र, ती सर्वदूर पोहोचवणे अािण तिच्या प्रसार, प्रचाराचे काम खूपच अवघड असते. मात्र, सर्वच प्रसिध्दी माध्यमांनी ही जबाबदारी अत्मियतेने पार पाडल्याने ‘मॅरेथॉन’ने चांगलीच गती घेतली आहे. सन २०१२ मध्ये पहिल्या वर्षी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तासभर अगोदर भरपूर पाऊस झाला. मात्र कोणत्याही अडथळ्यांनी डगमगून न जाता सुरू झालेली ही स्पर्धा सलग सहा वर्षे अखंडित सुरू आहे.समाजाची बदलती जीवनशैली, बैठ्या कामांची सवय, नियमित व्यायामाचा अभाव, अशा नानाविध गतिरोधकांमुळे मानवी आरोग्याची स्थिती दिवसेंदिवस दयनिय होत आहे. अशा तऱ्हेने नागरिकांचे आरोग्याचे बिघडलेलं गणित मापात आणण्यासाठीच सातारा मॅरेथॉनचा प्रपंच सुरू केल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. पहिल्या वर्षीच्या धडाकेबाज नियोजनानंतर सन २०१३ पासून ‘मॅरेथॉन’च्या आयोजनात नेमका व नेटकेपणा येऊ लागला व त्यातून स्थानिक आणि बाहेरील सहभागितांची संख्याही वाढू लागली. या स्पर्धेच्या उत्तम नियोजनाची ख्याती आंतरराष्ट्रीय धावपटू व रनर्स कम्युनिटीमध्ये पसरू लागली. जागतिक स्पर्धांत वर्चस्व असणाऱ्या केनिया, इथियोपियातील खेळाडूही साताऱ्यात आवर्जून येऊ लागले. च्मॅरेथॉन मार्गावर जागोजागी व चौकाचौकात प्रोत्साहन देणारे फलक, प्रत्यक्ष उपस्थित राहून खेळाडूंना चिअरअप देणारे अबालवृद्ध नागरिक, स्वयंसेवक ही सातारकरांची मॅरेथॉनसाठी उत्स्फू र्त प्रतिक्रिया असून त्या सर्वांमुळेच या स्पर्धेचा नाव लौकिक वाढल्याचे संयोजन समितीचे म्हणणे आहे.२१ किलोमीटरच्या ट्रॅकवर दर अडीच किलोमीटरवर सपोर्टीव्ह टिमची उपलब्धता आणि अन्य ‘टेक्निकल नॉर्म’ही व्यवस्थित अंमलबजावणी होत असल्याने स्पर्धेची चांगलीच ‘माऊथ पब्लिसिटी’ झाली. भारतातील अग्रगण्य हाफ मॅरेथॉनशंभरहून अधिक जागतिक स्पर्धांच्या नियोजनात सहभाग असलेले इंटरनॅशनल कोच सर नॉरी व्हीलह्यमसन यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातारा मॅरेथॉनच्या यशस्वीतेत प्रत्यक्ष उपस्थिती लावून बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या माध्यमातून आणि ‘रनर्स वर्ल्ड मॅगझिन’च्या लेखणीतून सातारा मॅरेथॉन सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट नियोजन असलेल्या पहिल्या पन्नास स्पर्धांपैकी एक ठरली आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील अग्रगण्य मानांकन असणारी दर्जेदार स्पर्धा ठरली आहे.पर्यटनालाही चालना...एका इव्हेंटच्या निमित्ताने स्थानिक आणि बाहेरील ५ ते ६ हजार व्यक्ती एकत्र येतात, ही बाबच कौतुकास्पद असून, बाहेरून येणाऱ्यांना पाचगणी-महाबळेश्वर शिवाय असणाऱ्या अनेक ‘हॉलिडे डेस्टीनेशन्स’ची ओळख यानिमित्ताने होते. बारामोटेची विहिर, कास पुष्प पठार, सज्जनगड, तापोळा धावडशी, संगम माहुली, देगाव पाटेश्वर, मेणवली, धोम धरण आदी विविध ठिकाणी गर्दी होवून पर्यटनालाही चालना मिळते, हे ‘सातारा मॅरेथॉनचे’ यशच आहे. सातारी कंदी पेढे, स्ट्रॉबेरी, चपला व्यवसाय, धान्य उत्पादन, खाद्य पदार्थ, कृषि उत्पादीत वस्तू आदी खास ‘सातारी टच’ असलेल्या प्रॉडक्टचीही यानिमित्ताने सर्वांना माहिती होते. - जयंत लंगडे