सचिन जवळकोटे , सातारासातारा जिल्ह्यात कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू हृषीकेश शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुडाळ (ता. जावळी) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी तरडगाव (ता. फलटण) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वहिनी शिवांजलीराजे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही सोमवारी जिल्हा परिषदेच्या साखरवाडी (ता. फलटण) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सदस्य व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रताप आनंदराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सुपने (ता. कराड) गटातून उमेदवारी अर्ज सोमवारी शक्तिप्रदर्शनासह दाखल केला. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदय पाटील यांनी येळगाव (ता. कराड) जिल्हा परिषद मतदारसंघातून विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. ते प्रथमच एका सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत.
साताऱ्यातही वारसदारच
By admin | Published: February 07, 2017 11:42 PM