लोकमत न्यूज नेटवर्कक-हाड (जि. सातारा) : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणा-या टोळीला क-हाड पोलिसांनी चतुर्भुज केल्यानंतर तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. दरोडा टाकण्यापूर्वी ही टोळी दोनवेळा दिल्लीतून चक्क विमानाने थेट पुण्यात व तेथून क-हाडात आली होती. तसेच या टोळीने आजपर्यंत देशभरात रेकी करून अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.अक्षय भारत कावरे (रा. अपशिंगे, ता. कडेगाव, जि. सांगली), अनमोल जीवनसिंग शर्मा (रा. हसी, जि. हिसार, हरियाणा), दीपक रामराज गर्ग (रा. पैकरहेडी, ता. जिंद, हरियाणा), ईश्वरसैनी राजकुमारसैनी (रा. पिहोवा, जि. कुरुक्षेत्र, हरियाणा) व महेंद्र सूर्यग्यान गुजर (रा. बाबुधाम, चाणक्यपुरी, नवी दिल्ली) अशी अटकेत असलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.कºहाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे १२ आॅगस्ट रोजी रात्री दत्तकृपा पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. पोलिसांनी शिताफीने दरोडेखोरांच्या टोळीला पकडले होते. तपासादरम्यान या दरोडेखोरांचे दिल्लीपर्यंतची ‘कनेक्शन’ पोलिसांच्या समोर आले आहे. दोनवेळा ही टोळी दिल्लीमधून थेट विमानाने पुण्यात व तेथून खासगी वाहनाने कºहाडात आली होती. सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील काही पंपांची पाहणी करून या टोळीने दरोड्याचा कट रचला होता. आणि पुढे काही दिवसांतच कडेगाव तसेच वडगावच्या पंपावर दरोडा टाकला होता. या टोळीने अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई आणि दिल्ली शहरासह व पंजाब राज्यात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा: दरोड्यासाठी ते विमानाने यायचे, देशभरात रेकी करून अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याचे स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 4:12 AM