शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

तिकीटबारीवर ‘सैराट’ सुसाट ; ५५ कोटींची केली कमाई

By admin | Published: May 15, 2016 3:56 PM

मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत सैराट या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमविण्याचा मान पटकाविला आहे. तीन आठवड्यांत ५५ कोटींची कमाई करत ५० कोटींच्यावर कमाई करण्याचा पहिला मान सैराटला मिळालायं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ : प्रेषकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे.  मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत सैराट या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमविण्याचा मान पटकाविला आहे. तीन आठवड्यांत ५५ कोटींची कमाई करत ५० कोटींच्यावर कमाई करण्याचा पहिला मान सैराटला मिळालायं. आर्ची आणि परशाची ही प्रेमकथा अजूनही राज्यभरातील चित्रपटगृहांमधून हाऊसफुल्ल गर्दी खेचते आहे. सैराट ची जादू अजूनही कायम असून प्रेक्षक ३-३ वेळा सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहातायंत. यापूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट चित्रपटाने तीन आठवडय़ांत ४० कोटींची कमाई केली होती. सैराटने कमीतकमी दिवसांत हा आकडा पार करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून आपले नाव कोरले आहे. 
यापूर्वी नटसम्राटने एका आठवड्यात १६ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा नटसम्राट २२ कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा ३५ कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या १० दिवसांतच पार करून नवा विक्रम केला आहे. सैराट सिनेमाने तिकिट खिडकीवर पहिल्या आठवड्यात तब्बल २५ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात कुठल्याही मराठी सिनेमाचीही सर्वाधिक कमाई आहे.
सैराट हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच फार चर्चेत होता. चित्रपटातील गाणी, ट्रेलर यांची झिंग प्रेक्षकांवर चढल्यामुळे सिनेमागृहाच्या बाहेर प्रेक्षकांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी रांगा लावल्या होत्या. तीन दिवसांपूर्वीच चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले , आठवडाभराची तिकिटे बुक झाली होती. ही परिस्थिती फक्त पुणे-मुंबईपुरतीच मर्यादित नव्हती, तर राज्यभरात सैराटला हाच रिस्पॉन्स मिळत होता.
अगदी खेड्यापाड्यात कधी सिनेमागृहात न गेलेला माणूसही आज सैराट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर जात आहे. सैराटचे पहिल्या दिवशीच जबरदस्त ओपनिंग मिळाले अन् या सिनेमाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सैराट महाराष्ट्रात ९८० ते १,२०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ४.२३ करोड, तर दुसऱ्या दिवशी ५.१० करोड अन् तिसऱ्या दिवशी ६.५० करोड व चौथ्या दिवशी ३ करोड, असे तीन ते चार दिवसांचेच कलेक्शन जवळपास १५ ते १९ करोडपर्यंत होते. 
 
सैराट हा नागराज मंजुळेचा दुसरा ​चित्रपट. सैराट आणि फँड्री या दोन्हीचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही. पण या दोन्ही ​चित्रपटांचे शेवट हा दोन्हीतला सामायिक धागा आहे. या दोन्हीत 'नागराज टच' आहे. सैराट ही गोष्ट आहे अर्ची आणि परशाची. एका गावात राहणारे एकमेकांच्या प्रेमात पडतात. अर्ची एका श्रीमंत घराण्यात राहणारी तर परशा अत्यंत गरीब घरात जन्मलेला. या दोघांच्या प्रेमाला त्यांच्या परिवाराचा विरोध आहे. समाजही या दोघांच्या नात्यांना स्वीकारत नाही. आज समाज प्रगती करतोय. जग पुढे चाललंय. विचारसरणी बदलतेय. अनेक जुन्या रुढी परंपरा मागे टाकून प्रगतीच्या दिशेनं प्रत्येक जण वाटचाल करतोय.. अशातच गरीब श्रीमंत, जात- पात, धर्मांच्या नावावर आजही भेद भाव करणारी मानसिकता अस्तित्वात आहे हे या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
दरम्यान, यापूर्वी नटसम्राटने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा नटसम्राट 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. दुसरीकडे कट्यार काळजात घुसली या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या लय भारीने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता.