शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

मुश्रीफ भाजपला पुरून उरतील असे नेते; पालकमंत्री सतेज पाटील यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 7:20 PM

आम्ही सर्वजण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत : सतेज पाटील

ठळक मुद्देआम्ही सर्वजण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत : सतेज पाटील

कोल्हापूर : "ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण आजपर्यंत अनेक संकटे ताकदीने परतवणारे मुश्रीफ हे या संकटावर तितक्याच ताकदीने मात करतील व भाजपला पुरून उरतील. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे म्हटले आहे.

"ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपच्या किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत, त्या सगळ्या प्रकरणांमध्ये यापूर्वीच चौकशी झाली आहे. त्यांची आयकर विभागाकडूनची चौकशी तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाली. या सगळ्या चौकशीचे निरसन ज्या-त्यावेळी झाले असून, त्याचे अहवाल आजही वेबसाईटवर उपलब्ध आहेत. असे असताना तेच आरोप पुन्हा करून मुश्रीफ यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे," असंही पाटील म्हणाले. 

दोन वर्षांचा काळ गेल्यानंतर महाराष्ट्रासारख्या प्रगतशील आणि सक्षम राज्याची सत्ता आपल्याकडे नाही, याचे शल्य भाजपला आहे. त्यातूनच महाविकास आघाडीतील नेत्यांना विविध मार्गाने टार्गेट केले जात आहे. मंत्री मुश्रीफ यांच्याबाबतीत जे काही घडते आहे, ते दुर्दैवी आहे. सामान्य माणसांशी नाळ जुळलेल्या त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गेली चाळीस वर्षे राजकारणापलीकडे जाऊन जनतेची सेवा केली आहे. सामान्य माणसासाठी त्यांच्या घराचा दरवाजा भल्या पहाटेपासून उघडा असतो. पण त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचे मन निश्चितपणे व्यथित होऊ शकते. निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच राहतात, परंतु निवडणूक झाल्यानंतर एकदा जनतेने निर्णय दिल्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या व्यक्तिगत मागे लागणे, हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. सर्वसामान्य जनतेचा नेता असलेल्या मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी या काळामध्ये आम्ही कणखरपणे उभे असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपाKirit Somaiyaकिरीट सोमय्याMaharashtraमहाराष्ट्र