शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

अनधिकृत बांधकामांवर आता उपग्रहाची नजर

By admin | Published: May 08, 2016 2:30 AM

नवी मुंबईतील दिघा येथील एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांसह नालासोपारा येथील अनधिकृत बांधकामे तोडावीत, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर

- नारायण जाधव,  ठाणे

नवी मुंबईतील दिघा येथील एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांसह नालासोपारा येथील अनधिकृत बांधकामे तोडावीत, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आपले म्हणणे मांडताना राज्य शासनाने डिसेंबर २०१२पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केल्यानंतर शासनाने तसे न्यायालयाला कळवले होते. मात्र, शासनाचा हा निर्णय न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर राज्यातील सर्वच नागरी क्षेत्रांत भूछत्राप्रमाणे होणारी अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर उपग्रह छायाचित्रांचा उतारा शोधला आहे. राज्यभरातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा एमआयडीसी, सिडको यासारख्या प्राधिकरणांनी दर सहा महिन्यांनी आपल्या कार्यक्षेत्राचा अतिउच्च प्रतीचा सुमारे ०.५ रिझोल्यूशन असलेला उपग्रह छायाचित्रांचा मेस मॅप तयार करावा. त्याआधारे शहरातील मंजूर बांधकामे, मंजूर बांधकाम प्रकल्पांचे आरेखन तयार करावे. याव्यतिरिक्त नव्याने होणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे त्वरित तोडावीत. याबाबत, दर सहा महिन्यांनी आढावा घ्यावा. नव्याने होणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी त्या-त्या प्राधिकरणाने संबंधितांना नोटिसा बजावून अशा बांधकामांची नोंद ठेवून ती होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे बजावण्यात आले असून, याकरिता स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यास सांगितले आहे.

- ठाणे जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाखांहून अधिक बांधकामांना यामुळे दिलासा मिळणार होता. मात्र डम्पिंग, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील सातही महापालिकांसह राज्यातील इतर महानगरांत नागरी सुविधांचे तीनतेरा वाजतील, ही भीती ओळखून न्यायालयाने २०१२पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय फेटाळून राज्य शासनास फटकारल्यानंतर जागे झालेल्या नगरविकास खात्याने आता अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी उपग्रह छायाचित्रांचा आधार घेतल्याचे सांगण्यात येते.- विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राज्य शासनाने उपग्रह छायाचित्र संकलनासह भौगोलिक माहिती प्रणालीचा राज्यात वापर करण्यासाठी नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रास राज्यातील नोडल एजन्सी अर्थात प्रमुख संस्था म्हणून नियुक्त केले आहे.