मोहन मस्कर-पाटील -सातारा --वाढत्या नागरिकीकरणामुळे सातारा जिल्ह्यात हिंसामय गुन्ह्यांत वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्राची आकडेवारी लक्षात घेता हिंसामय गुन्ह्यात सातारा जिल्हा सातव्या क्रमांकावर आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना आणि ‘सीआयडी’चा अहवाल लक्षात घेता त्यास बळकटी मिळते. सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी १,०५९ हिंसामय गुन्हे घडले असून, २०१२ मधील संख्या ७८५ इतकी आहे. याचाच अर्थ एका वर्षाच्या अंतरात हिंसामय गुन्ह्यांत तीनशेने झालेली वाढ ही ‘शांत’ सातारा ‘अशांत जिल्हा’ बनत झाल्याचे स्पष्ट होते. वाढत्या नागरिकीकरणामुळे हिंसामय गुन्ह्यांची संख्या वाढतच आहे. राज्य गुन्हे अन्वेषण तथा ‘सीआयडी’ने सर्वसाधारण गुन्ह्यांपासून ‘हिंसामय गुन्हे’ वेगळे करून त्याची स्वतंत्रपणे चिकित्सा केली आहे. त्यामुळे हिंसामय गुन्ह्यांची दाहकता आणि तीव्रता लक्षात येते. कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण तर सातारा, सांगली, कोल्हापूर हे तीन जिल्हे येतात. ‘सीआयडी-२०१३’ च्या अहवालानुसार कोल्हापूर परिक्षेत्रात हिंसामय गुन्हे वाढले आहेत. पुणे ग्रामीण पहिल्या क्रमांकावर असून, येथील हिंसामय गुन्हे १,४५३ इतके आहेत. पुणे ग्रामीणच्या बरोबरीनेच सातारा जिल्हा चालला असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होते. ‘सीआयडी’ने हिंसामय गुन्ह्यांचे चार टप्प्यांमध्ये वर्गीकरण केले आहे. जीवितावर परिणाम करणारे या घटकात खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हुंडाबळी, अपहरण व पळवून नेणे याचा समावेश केला आहे. मालमत्तेवर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यांत दरोडा, जबरी चोरी तर सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यांत दंगा आणि जाळपोळ याचा उल्लेख केला आहे. स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये फक्त बलात्कार याचाच उल्लेख केला आहे.२०१२ आणि २०१३ ची तुलना करता सातारा जिल्ह्यात जीवितावर परिणाम करणारे, सार्वजनिक सुरक्षितेतेवर परिणाम करणाऱ्या हिंसात्मक गुन्ह्यांत वाढ झाली आहे. २०१२ मध्ये सातारा जिल्ह्यात ७८५ तर २०१३ मध्ये १,०५९ हिंसामय गुन्हे झाले आहेत. यापैकी मालमत्तेवर आणि स्त्रियांवर परिणाम करणारे हिंसामय गुन्हे सर्वाधिक आहेत.कोल्हापूर परिक्षेत्रातील हिंसामय गुन्हेजिल्हाखूनखुनाचा प्रयत्नसदोष मनुष्यवधबलात्कारअपहरणदरोडाजबरी चोरीदंगाजाळपोळहुंडाबळीएकूणपुणे ग्रामीण१३२१०८१३१५०१००४२२७९५७८४५६१४५३सातारा६२७२७८८५९५३२७५४१७२२४१०५९कोल्हापूर६८५७००८४५३२०१६३३४८२२१४८२९सोलापूर ग्रामीण७४४५१२८२३९२१८५३९७३४१७९०सांगली५९४२५७७४५३४५२३३२१८५३८एकूण३९५३२४३७४८१२९६१३९८४७१९७३१४४३३४६६९बलात्काराचे गुन्हे वाढलेसातारा जिल्ह्यात २०१३ मध्ये बलात्काराच्या घटना ८८ आहेत. मात्र, २०१२ मध्ये हेच प्रमाण ४३ होते. याचाच अर्थ यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यापैकी बहुतांशी गुन्हे केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने अथवा वैयक्तिक वैरभावातून दाखल केल्याचे अनेकदा पोलीस अधिकारी खासगीत मान्य करतात. मात्र, काही गुन्ह्यांत शंभर टक्के तथ्य असल्याचेही ते कबूल करतात. दरम्यान, सातारचा शेजारी असलेला पुणे जिल्हा मात्र आघाडीवर असून, येथील आकडा १५० आहे.साताऱ्यात सर्वाधिक ५३ गुन्हे दाखल झाल्याची नोंद असली तरी यामध्ये तांत्रिक गुन्ह्यांची नोंद सर्वाधिक आहे. जेथे राजकीय संघर्ष अधिक आहे, तेथे दरोड्याचे खोटे गुन्हे अधिक दाखल झाले आहेत. पोलिसांना ही बाब तत्काळ लक्षात येते. राजकीय वैरभाव, वैयक्तिक फायदा आणि इतर कारणांसाठी प्रतिस्पर्धी अथवा आपल्या शत्रूंवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही आकडेवारी फुगल्याचे स्पष्टपणे दिसते.- पद्माकर घनवट,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारासातारा जिल्ह्यात दरोड्याचे सर्वाधिक गुन्हेराज्यात २०१३ मध्ये दाखल झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता सातारा जिल्ह्यात सर्वाधिक दरोडे पडले आहेत. सीआयडी अहवालात त्या अनुषंगाने चिंताही व्यक्त केली आहे. साताऱ्यात सर्वाधिक ५३ दरोड्यांचे गुन्हे नोंद झाले असून, राज्यातील एकूण तुलनेत हे प्रमाण ६.३६ टक्के इतके आहे. यापाठोपाठ नाशिक ग्रामीण ४७, ठाणे ग्रामीण ४२, अहमदनगर ४४, धुळे ४२, पुणे ग्रामीण ४२ तर मुंबई शहरात दरोड्याचे ४१ गुन्हे नोंद झाले आहेत.सीआयडी रिपोर्ट आणि सातारा जिल्हाकोरेगाव तालुक्यात एका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जाळलेली एसटी बस हिंसामय गुन्ह्याची साक्ष देतो. सीआयडीरिपोर्ट
‘शांत’ सातारा बनतोय ‘अशांत जिल्हा’
By admin | Published: December 15, 2014 9:03 PM