शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

MPSC exam postponed : परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार? असा सवाल करत काँग्रेस नेत्याने नोंदवला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 4:22 PM

MPSC exam postponed : परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे. मात्र पूर्ण तयारी झालेली असताना अगदी तीन दिवस अगोदर परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? असा सवाल करत या निर्णयाचा निषेध युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे. (Maharashtra Youth Congress president Satyajeet Tambe comments on Maharashtra Public Service Commission (MPSC) on Thursday postponed its preliminary exam scheduled for March 14 in view of the rising COVID-19 cases in the state)

यासंदर्भात सत्यजित तांबे यांनी ट्विट केले आहे. "एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे, असे सत्यजित तांबे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना संकटामुळे मागील वर्षभरात जीवनमान विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम शैक्षणिक पातळीवर पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तसेच एमपीएससीच्या उमेदवारांना देखील याचा चांगलाच फटका बसला आहे. पहिल्यांदा २०१९ च्या मार्च महिन्यामध्ये एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर एमपीएससी नेच जाहीर करण्यात आलेली ११ ऑक्टोबर सुद्धा मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाले दिलेल्या स्थगितीमुळे रद्द करण्यात आली. आता १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी ची परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे. 

('एमपीएससी'ची तारीख पे तारीख! १४ मार्चला होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली)

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पत्रानंतर निर्णय१४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत.त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्यानं ती पुढे ढकलण्यात यावी, असं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेMPSC examएमपीएससी परीक्षाcongressकाँग्रेसEducationशिक्षण