शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

थकबाकीदारांवर नवी मुंबईत ‘संक्रांत’

By admin | Published: January 25, 2017 3:44 AM

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ८८०० जणांची यादी तयार

नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ८८०० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. ८३० मोठ्या थकबाकीदारांना ४८ तासांची अंतिम नोटीस दिली असून, २३ जणांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता व एलबीटी विभागातील थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कर विभागातील थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची संख्या ८८००पेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस पाठविण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या ८३० मोठ्या थकबाकीदारांना कर भरण्यासाठी ४८ तासांची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. मंगळवारी यापैकी २३ जणांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे ६० कोटी ९४ लाख १७ हजार २७५ रुपये थकबाकी आहे. सर्व थकबाकीदारांनी त्यांची थकीत रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरावी अशा सूचना दिल्या होत्या. परंतु यानंतरही थकीत रक्कम न भरल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी एलबीटी थकविणाऱ्यांच्या मालमत्ता सील केल्या होत्या. पण मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या मालमत्ता सील केलेल्या नव्हत्या. पहिल्यांदाच अशा प्रकारे कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.नोटीस दिलेल्या थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा केला नाही, तर संबंधितांवर कारवाई सुरूच ठेवली जाईल, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)