जयंत धुळप / ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 6 - अरबी समुद्रात छत्नपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे, ही आनंदाची बाब आहे. तथापी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवंत स्मारक असलेले गडकिल्ले जतन करण्याचे काम प्रथम झाले पाहिजे अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समीतीच्यावतीने, किल्ले रायगडावर मंगळवारी आयोजित 344 वा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला. त्यावेळी खासदार संभाजीराजे बोलत होते.
रायगडच्या संवर्धनात शिवभक्तांनी वर्षातून दोन वेळा श्रमदान करावे.
खासदार संभाजीराजे यांनी रायगडच्या संवर्धनाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या संवर्धन रायगडचे या शिवभक्तांच्या परिसंवादात जवळपास 12क्क् प्रश्न उपस्थित झाल्याचे ते म्हणाले. रायगडच्या संवर्धनात शिवभक्तांनी वर्षातून दोन वेळा श्रमदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रारंभी खासदार छत्नपती संभाजी राजे यांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेकाला सुरु वात करण्यात आली. छत्नपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास विविध गडावरु न आणलेल्या पाण्याने सह दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी युवराज शहाजीराजे तसेच जलसंपदा राज्यमंत्नी विजय शिवतारे, समीतीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रसेवा समुह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे आदि मान्यवरांसह व देशभरातून आलेले शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
रायगड देशवासीयांचा आत्मा-
नुकतेच सेवानिवृत्त झालेले कोकण महसूल आयुक्त तथा किल्ले रायगड संवर्धनाचे प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर देशमुख यावेळी बोलताना म्हणाले, रायगड किल्ला हा तमाम देशवासीयांचा आत्मा असून या किल्ल्याच्या संवर्धनाकरीता शासनाने 6क्क् कोटी रु पये मंजूर केले आहेत. त्यातून संवर्धनाचे काम सुरु आहे. शिवसमाधीचा डोंब दुरु स्त करण्यात आला असून किल्ल्यावरील तलावांची स्वच्छता करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगीतले. या संवर्धन आराखडयामध्ये परिसरातील गावांचा विकास आराखडा देखील तयार केल्याचे ते म्हणाले. शासनामार्फत रायगड किल्ला संवर्धनाचे कार्य चांगल्या पध्दतीने सुरु आहे. त्याद्वारे रायगडचे शिवकालीन वैभव पुन्हा जोमाने उभे राहील असा विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.
प्रचंड जल्लोषात शिवराज्याभिषेकाचा लोकोत्सव रायगड किल्ल्यावर साजरा झाला. यात ढोल, ताशे यांचा गजर तसेच पारंपारिक वेशपरिधान केलेले शिवभक्त आदिंचा उत्साह मोठा होता. पहाटे पाच वाजता शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्र मास सुरु वात झाली. नगारखान्या समोर ध्वजारोहण करण्यात आले. शाहीरी कार्यक्र म मोठया जल्लोषात झाले. तसेच विविध मर्दानी खेळ, दांडपट्टा यांचे प्रात्यिक्षकेही दाखिवण्यात आली.
फोटो- भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समीतीच्यावतीने, किल्ले रायगडावर मंगळवारी आयोजित 344 व्या राज्याभिषेक सोहळ्य़ात सहभागी झालेले खासदार संभाजीराजे दिसत आहेत तर शेजारी युवराज शहाजीराजे ,जलसंपदा राज्यमंत्नी विजय शिवतारे, समीतीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रसेवा समुह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे आदी.