मुंबई : जागतिक स्तरावर अवैध शिकार, आंतरराष्ट्रीय तस्करी, अधिवासांचा नाश यामुळे अत्यंत धोक्यात असलेल्या भारतीय खवले मांजरांच्या संरक्षण संवर्धन प्राणिमित्र संघटनेने हाती घेतले आहे़ ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संघटनेने खबले मांजर बचाव मोहीम हाती घेतली आहे़ गेल्या वर्षभरामध्ये पोफळी, दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मोठ्या प्रमाणात खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी पकडण्यात आली. या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या वतीने वनविभाग व पोलीस यांच्या सहकार्याने ‘खवले मांजर वाचवा’ प्रकल्पांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत ठिकठिकाणी पत्रकेवाटपासह प्रत्यक्ष संरक्षणाचे काम करण्यात येत आहे, असे सह्याद्रीचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी सांगितले़चिनी औषधांमध्ये खवल्याच्या पावडरचा वापर हे त्याच्या नाशाचे कारण बनत आहे. त्याचप्रमाणे खवल्यासाठी, मांसासाठी व कातडीसाठीही त्याची हत्या होते. खवल्यांना असलेल्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणात त्याची शिकार होते आहे. परिसराचा विकास या नावाखाली त्यांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत आहे. परिणामी, हा प्राणी दुर्मीळ झाला आहे. खवले मांजर हा संपूर्ण शरीरावर खवले असणारा एकमात्र सस्तन प्राणी आहे. देशात खवले मांजराच्या दोन प्रजाती आढळून येतात. कोकणात आढळणारे भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५किलोपर्यंत वाढते. त्याच्या अंगावर असलेले खवले हे किरॅटीन नामक द्रवापासून तयार होतात. पाय, पोट, कपाळ असा काही भाग सोडल्यास संपूर्ण अंगभर हे खवले असतात. (प्रतिनिधी)खवले मांजर हे निशाचर तसेच बिळात राहणारे असल्यामुळे त्याच्यावर जास्त प्रमाणात संशोधनपर कार्य होऊ शकले नाही.एका प्राण्याच्या अंगावर अंदाजे ४०० ते ४५० खवले असतात. हा प्राणी निशाचर आहे.खवले मांजर मांसाहारी वर्गातील असून, त्याचे मुख्य खाद्य म्हणजे वाळवी, मुंग्या व वारुळात राहणारे इतर जीव आहेत.खवले मांजराला दात नसल्यामुळे खाद्य खाण्यासाठी आपल्या १० ते १२ इंच लांब जिभेचा उपयोग करते.खवले मांजर साधारणत: ७० ते ८० कोटी किडे वर्षभरात खात निसर्गचक्राचा तोल सांभाळते.खवले मांजरापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.
भारतीय खवले मांजर वाचवा
By admin | Published: March 03, 2017 2:17 AM