मुंबई : देशासह राज्यात दरवर्षी हजारो जणांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. विशेषत: राज्यात हा आकडा अधिक आहे. याचा सारासार विचार करत सर्पापासून मनुष्यप्राण्याचा विशेषत: शेतकऱ्याचा बचाव व्हावा म्हणून कर्नाटक येथील ‘प्रसादम् इंडस्ट्रीज’ने ‘द स्नेक गार्ड’चा शोध लावला आहे. सौरऊर्जेवर चालणाºया या उपकरणातून पसरणाºया तरंगांमुळे सर्प मनुष्यप्राण्याच्या आसपास येत नसल्याचा दावा ‘प्रसादम्’ने केला आहे. परिणामी, सर्पदंशाच्या घटना घडणार नाहीत; आणि सर्प दिसल्यास त्यास मारण्याचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास ‘प्रसादम्’कडून व्यक्त करण्यात आला.सर्पदंशाने भारतात दरवर्षी ४६ हजार जणांचा मृत्यू होतो. राज्याचा विचार करता २०१७ साली महाराष्ट्रात सर्पदंशाच्या अनेक घटना घडल्या. सर्पदंशाच्या घटनांची नोंद १९ हजार १२ असून, त्यापैकी ५ हजार ४२५ नोंदी या ग्रामीण भागातील आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्प आढळला तर साहजिकच स्वसंरक्षणासाठी त्याला ठार केले जाते; मात्र अशा घटना घडताना यावर उपाययोजना काहीच केल्या जात नाहीत. परिणामी समस्या वाढतच जातात. यावर जालीम उपाय म्हणून ‘द स्नेक गार्ड’चा शोध लावला आहे. ‘प्रसादम् इंडस्ट्रीज’ आता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मदतीसाठी सरसावली आहे. सर्पापासून स्वबचावासाठी ‘प्रसादम्’ने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकºयांना ‘द स्नेक गार्ड’ प्रदान केले आहे.शेतात काम करताना सर्पांपासून बचावासाठी शेतकरी काठीचा वापर करतात. मात्र, यावर उपाय म्हणून ‘प्रसादम्’ने हे अल्ट्रासोनिक सोलार पॉवर कार्यप्रणाली संबंधित उपकरण वापरात आणले आहे. ते शेतकºयांना सोबत ठेवण्याएवढे सोयीचे असून, शेतात काम करताना सर्पांपासून बचाव करण्यासाठी ते जमिनीत गाडून उभे करता येईल, असे आहे. या उपकरणाच्या परिसरालगत सर्पांचा अधिवास आढळल्यास शेतकºयांना दक्षता बाळगता येईल. महत्त्वाचे म्हणजे उपकरण सौरऊर्जेवर चालणारे असल्याने ते हाताळणेही सोपे असून खर्चीक नाही; असा दावा ‘प्रसादम्’ने केला आहे. कर्नाटकसह महाराष्ट्रातील शेतकºयांना ‘द स्नेक गार्ड’ हे उपकरण वितरित केले असून, याचा निश्चितच शेतकºयांना फायदा होत असल्याचा दावा संस्थेने केला आहे.सौरऊर्जेवर चालते उपकरण‘द स्नेक गार्ड’ या उपकरणामधून निघणाºया तरंगांमुळे सर्प आसपासही येत नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. उपकरण सौरऊर्जेवर चालते. त्याला चार्ज करण्याची गरज नाही. प्रत्येक सर्प विषारी असेल असे नाहीच. मात्र, सर्प आढळला की त्याला मारले जाते. तो बिनविषारी की विषारी हे पाहण्याची ती वेळ नसते. परिणामी, सर्पाचा जीव वाचवा, यासाठी हे उपकरण तयार केल्याचे ‘प्रसादम्’ने म्हटले आहे. ‘प्रसादम्’चे संस्थापक वेदोब्रोतो रॉय यांच्या म्हणण्यानुसार, हे उपकरण प्रायोगिक आहे. कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाने त्याचा वापर केला असून, त्यांचे अनुभव चांगले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सर्पापासून वाचवतेय ‘जादूची काठी’, सौरऊर्जेवर चालते उपकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:49 AM