- राजकुमार जोंधळे, लातूरप्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान राबविल्यामुळे जिल्ह्यात तब्बल २ कोटी २१ लाखांची बचत झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लातूर शाखेने दिली आहे. या अभियानात जिल्हाभरातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.अंनिसने राज्यात फटाकेविरोधी अभियान राबविले. लातूरमध्ये ‘प्रबोधन रॅली’ काढण्यात आली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १८६ शाळांतील २० हजार ३८६ शालेय विद्यार्थ्यांनी ‘फटाकेमुक्त’ दिवाळी साजरी केली. लातूर तालुक्यातील १०, अहमदपूरमधील २, चाकुरातील १२३, निलंगामधील ३१, रेणापुरातील ४, औसा तालुक्यातील ६, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील १० शाळांतील अशा एकूण १८६ शाळांतील २० हजार ३८६ विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली.विद्यार्थ्यांचा संकल्प जिल्हाभरात अंनिसच्या वतीने राबविण्यात आलेल्या फटाकेमुक्त दिवाळीला विद्यार्थ्यांतून प्रतिसाद मिळाला असून, यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला होता. त्यातून होणारी बचत शालेय साहित्यावर खर्च करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्यात अभियान राबविण्यात आल्याची माहिती अंनिसचे रामकुमार रायवाडीकर, अनिल दरेकर यांनी दिली.
फटाकेमुक्त दिवाळीतून सव्वा दोन कोटींची बचत
By admin | Published: November 18, 2015 2:13 AM