शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशात सातवा क्रमांक, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत अव्वल; संशोधनात मात्र तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:14 AM

टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाºया संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे.

पुणे : टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाºया संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे ते अव्वल ठरले आहे.हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही. देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स ही संस्था पहिल्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर पहिल्या अडीचशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.‘टाइम्स’ या संस्थेकडून दर वर्षी देशातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते. या मानांकनाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व आहे. या वर्षी संस्थेने ७७ देशांमधील विविध संस्थांचा अभ्यास करून मंगळवारी जागतिक क्रमवारी जाहीर केली. या यादीत आॅक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. तर, २७ देशांतील किमान एका विद्यापीठाचा समावेश पहिल्या २००मध्ये आहे.मात्र, भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश पहिल्या अडीचशेमध्ये होऊ शकलेला नाही. एक हजार संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील केवळ ४२ संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या ३०० संस्थांमध्ये व देशात पहिल्या स्थानावर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स या संस्थेचा क्रमांक लागला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थांना स्थान मिळाले आहे.देशात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संयुक्तपणे सातवा क्रमांक पटकावला असून पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल ठरले आहे. मागील वर्षी हे विद्यापीठ आठव्या क्रमांकावर होते. यंदा विद्यापीठाने कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठाला मागे टाकले आहे.जागतिक पातळीवर पुणे विद्यापीठ ६०१ ते ८०० या क्रमावारीत आहे. या क्रमवारीत देशातील एकूण ११ विद्यापीठांचा समावेश आहे. मागील वर्षीही याच क्रमवारीत विद्यापीठाला स्थान मिळाले होते.यंदा विद्यापीठाला एकूण ३०.६ गुण मिळाले असून एकूण कामगिरीचा विचार करता विद्यापीठाच्या गुणांकनात यंदा काहीशी सुधारणा झाली आहे. आशियाई देशांमध्ये विद्यापीठ १६१ ते १७० या क्रमवारीत असून ब्रिक्स व विकसनशील देशांच्या यादीत १४३वे स्थान मिळाले आहे.पुणे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही पारंपरिक विद्यापीठ तसेच इतर शैक्षणिक संस्थांचा जगातील पहिल्या एक हजार संस्थांमध्ये समावेश होऊ शकलेला नाही.संशोधनात तळालासावित्रीबाई फुले विद्यापीठाने एकूण कामगिरीत देशात सातवा क्रमांक मिळविला असला, तरी संशोधनात मात्र हे विद्यापीठ तळाला गेले आहे. देशात संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठ ४१व्या क्रमांकावर घसरले आहे. ‘टाइम्स’ने दिलेल्या गुणांकनामध्ये मागील दोन वर्षांत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. या वर्षी विद्यापीठाला केवळ ७.२ गुण मिळाले आहेत.देशातील संस्थांची क्रमवारी(कंसात टाइम्स क्रमवारी)१ आयआयटी, मुंबई (३५१-४००)२ आयआयटी, दिल्ली (५०१-६००)३ आयआयटी, कानपूर४ आयआयटी, खरगपूर५ आयआयटी, रुरकी६ इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, बंगळुरू (२५१-३००)७ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (६०१ ते ८००)अध्यापनात चौथ्या स्थानीसंशोधनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागे राहिले असले, तरी अध्यापनात मात्र विद्यापीठाने देशात चौथे स्थान मिळविले आहे. तर, पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात ते अव्वल ठरले आहे. अध्यापनात विद्यापीठाला ३८.९ गुण मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे. आयआयएस (बंगळुरू), आयआयटी मुंबई व दिल्ली यापाठोपाठ विद्यापीठाचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उद्योगांशी सांगड या बाबतीतही विद्यापीठाने चांगली कामगिरी केली आहे.

टॅग्स :Puneपुणे