शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर

By admin | Published: September 23, 2016 2:40 AM

देशातील पारंपरिक विदयापीठांच्या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने यंदा दुसरा क्रमांक पटकावला आहे.

पुणे : देशातील पारंपरिक विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा दुसरा क्रमांक पटकावला आहे. टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेने जाहीर केलेल्या रँकिंकमध्ये पुणे विद्यापीठाने पंजाब विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. देशातील सर्व आयआयटी आणि पारंपरिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे.टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेतर्फे जगभरातील विद्यापीठांसह भारतातील विद्यापीठांचे रॅकिंग केले जाते. गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह देशभरातील पारंपरिक विद्यापीठांचे रँकिंग जाहीर करण्यात आले होते. त्यात प्रथम क्रमांकावर जाधवपूर विद्यापीठ आणि द्वितीय क्रमांकावर पंजाब विद्यापीठ होते. तर, तिसऱ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होते. यंदा विद्यापीठाने तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेने मार्च २०१६मध्ये १५० विविध मुद्द्यांवर माहिती मागवली होती. तसेच, जागातिक स्तरावरील नामांकित जर्नलमध्ये विद्यापीठामधील प्राध्यापकांचे रिसर्च पेपर आणि रिसर्च पेपरचा दर्जा यांचा आढावा टाइम्स हायर एज्युकेशनने घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत ६०० ते ८००च्या दरम्यान आहे. विद्यापीठाची अध्यापन पद्धती, औद्योगिक कंपन्यांचे विद्यापीठाशी असणारे संबंध, विद्यार्थी व प्राध्यापकांचे संशोधनातील योगदान विचारात घेऊन विद्यापीठाचे रँकिंग निश्चित करण्यात आले आहे.