शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : अधिसभेत येणार शिक्षण शुल्कवाढीचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 8:11 PM

महागाईच्या झळा सोसत असताना शुल्कवाढीचा बोजा पडल्यास सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार

ठळक मुद्दे१४ डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिसभेत होणार चर्चाविद्याशाखांची शिक्षण शुल्कामध्ये विद्यापीठ स्तरावर वाढ करून शुल्क निश्चित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थांमधील अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कात ३० टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २० टक्के वाढ करण्याबाबत अधिसभेत ठराव मांडण्यात आला आहे. या ठरावावर दि. १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिसभेत चर्चा होणार आहे. आधीच महागाईच्या झळा सोसत असताना शुल्कवाढीचा बोजा पडल्यास सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. विद्यापीठाची अधिसभा दि. १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या अधिसभेची कार्यक्रमपत्रिका विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अधिसभा सदस्यांनी शुल्कवाढीसह विविध विषयांवर ठराव मांडण्यात आले आहेत. या सर्व ठरावांवर अधिसभेत चर्चा होऊन सदस्यांमध्ये एकमत झाल्यास त्याला मंजुरी मिळते. अधिसभा सदस्य डॉ. प्रकाश पाटील यांनी शुल्कवाढीचा ठराव मांडला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पर्यंत महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांची शिक्षण शुल्कामध्ये विद्यापीठ स्तरावर वाढ करून शुल्क निश्चित करावे. शुल्क निश्चित करण्यासंदर्भात विद्यापीठ स्तरावर कार्यप्रणाली मुदतीत पुर्ण होणार नसेल तर प्राथमिक स्वरूपात यामध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३० टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २० टक्के वाढ करावी, असे ठरावात नमुद करण्यात आले आहे. तसेच प्राचार्य डॉ. संजय खरात यांनीही शिक्षण शुल्क पुनर्रचित करण्याचा ठराव मांडला आहे. याविषयी बोलताना पाटील म्हणाले, महाविद्यालयांना ६-७ वर्षापुर्वीपर्यंत दरवर्षी १० शुल्कवाढ करण्याचा अधिकार होता. पण त्यानंतर शुल्कवाढीवर बंधने घालण्यात आली. मागील काही वर्षात कर्मचारी, शिक्षकांचे वेतन वाढले आहे. महागाई सातत्याने वाढत आहे. विविध उपक्रमांसह महाविद्यालयांच्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या खर्चामुळे महाविद्यालय चालविणे अवघड होते. शुल्कवाढीसंदर्भात विद्यापीठाने काहीच पावले उचलली नाहीत. महाविद्यालय स्तरावर वाढ केल्यास त्याला विरोध होतो. त्यामुळे विद्यापीठानेच शुल्कवाढीसाठी मान्यता द्यावी, यासाठी ठराव मांडण्यात आला आहे. याबाबत प्राचार्य फोरममध्येही चर्चा करण्यात आली असून सर्वजण सकारात्मक आहेत. -------------शुल्क प्रतिपुर्ती कमी मिळतेसमाज कल्याण विभागाकडून देण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्ती अंतर्गत महाविद्यालयाला मिळणारे शिक्षण शुल्काची रक्कम कमी मिळते. त्यामुळे महाविद्यालयाला आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत विद्यापीठाने पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे ठरावही डॉ. संजय खरात यांंनी मांडला आहे. या ठरावासह शिक्षण शुल्कासंबंधी तीन ठराव असल्याने अधिसभेमध्ये हा मुद्या गाजण्याची शक्यता आहे. --------------

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी