ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. २२ : पिंपरी कॅम्प येथे सव्वालाख रुपये किमतीचे मोबाईलचे बनावट सुटे भाग पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी कॉपीराईटचा गुन्हा दाखल झाला आहे. कमलेश मोहनलाल बिश्नोई (वय २०, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. या प्रकरणी अलमतीन महमदशरीफ शेख (वय ३६, रा. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बिश्नोई यांचे पिंपरीतील के.डी. मार्केट येथे कोमल अॅक्सेसरीज हे दुकान आहे. येथे इन्टेक्स टेक्नॉलॉजी या कंपनीच्या मोबाईलचे बनावट सुटे भाग असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत इन्टेक्स कंपनीच्या १८१ नग बनावट बॅटऱ्या, बनावट स्क्रीन गार्ड १३० नग, कव्हर ४२ नग असा एकूण १ लाख ३५ हजार ४८९ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. पिंपरी बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तु विक्रीच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट वस्तुंची विक्री केली