शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

‘दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार’ किरीट सोमय्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 1:07 PM

Kirit Somaiya News: तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे.

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांना मोठा इशारा दिला आहे. तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे.

किरिट सोमय्या यावेळी म्हणाले की, दिवाळी येत आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात. पण किरिट सोमय्या दिवाळीनंतर फटाके वाजवणार आहे. एक दोन नाही तर पूर्ण आठ जणांचे फटाके फोडणार आहे. दिवाळी ते देवदिवाळी या काळात एक एक करून घोटाळे उघड केले जातील. यांनी गेले १२ दिवस नौटंकी केली. मात्र आता तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयांचे तीन घोटाळे बाहेर काढले जातील, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

यांनी लवंगी फटाकडी लावली मात्र ती फुस्स झाली. राज्यात उघडकीस येत असलेल्या घोटाळ्यांवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष विचलित करायचे होते. गेले १३ दिवस नवाब मलिक यांनी बेछूट आरोपांचे सत्र लावले आहे. आधी ट्विट करतात, मग फेसबुकवर जातात, मग पत्रकार परिषद घेतात. १३ दिवस चाललंय काय, समीर वानखेडे हिंदू नाही मुस्लिम, क्रांती रेडकर तुझं लग्न हिंदू पद्धतीनं झालं पण तुझा पती मुस्लिम आहे. त्याचा पहिला निकाह मुस्लिम पद्धतीने झालं होतं. त्याच समीरचे वडील ज्ञानदेव नाही तर दाऊद आहे. त्याचा बाप दाऊद नाही तर तुमच्या सरकारचे पालक असलेल्या शरद पवार यांना जाऊन विचारा की १९९३-१९९४ मध्ये दाऊदसोबत विमानाने कोण बसलं होतं ते?, अशी बोचरी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली.

ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा एक मंत्री गेले १३ दिवस हिंदू धर्माचा अपमान करतो, दलितांचा अपमान करतोय, समीर वानखेडेंच्या कुटुंबाचा अपमान करतो आहे, यांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. १३ दिवस तुम्ही नाटक केलं. आता या सरकारचं तेरावं आम्ही महाष्ट्रातील जनता मिळून घालू. समीर वानखेडेंनी काय केलंय, अधिकाऱ्यानं चूक केली असेल तर करा ना तक्रार. तक्रार केल्यावर केंद्राची टीम आली ना. ज्या पंचांनं कोट्यवधीच्या व्यवहाराची तक्रार केली, ती तरी आम्हाला द्या म्हटल्यावर यांची टरकली. मग यांनी काय केलं तर ते खोटं बोलणारे जे कुणी लबाड होते त्यांना अंडरग्राऊंड केलं, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण