‘मुसलमानांनी हिंदूंचा आदर केलाच पाहिजे’ हे विश्व हिंदू परिषदेच्या अशोक सिंघल या पुढा:याने त्यांना बजावणो, ‘मुजफ्फरनगरच्या दंगलीची आठवण ठेवा’ अशी त्याच संघटनेच्या प्रवीण तोगडियाने त्यांना धमकी देणो आणि आता शिवसेनेच्या खासदारांनी एकत्र येऊन दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील अर्शदभाई या मुस्लीम कर्मचा:याला त्याचा रमजानचा रोजा सक्तीने मोडायला लावून अन्न खाऊ घालणो या घटना देश व समाज यांना एका हिंस्र स्फोटाच्या दिशेने नेणा:या आहेत. त्या जेवढय़ा निंद्य तेवढय़ाच निषेधार्ह आहेत. धमकीवजा भाषा आणि झुंडशाहीची चुणूक दाखविणारी ही माणसे दिल्लीतील नव्या सरकारला पाठिंबा देणारी असल्याची ही बाब लक्षात घेतली, की हा देशच हल्लेखोरांच्या तावडीत सापडला असावा, असेच कुणालाही वाटावे. रमजान हा मुसलमानांचा अतिशय पवित्र महिना असून, त्यातला रोजा (उपवास) हा त्यांच्या धार्मिक उपासनेची परिपूर्ती करणारा आहे. या स्थितीत एका असाहाय्य कर्मचा:याला अनेक खासदारांनी मिळून तो सोडायला लावण्याची सक्ती करणो, हा म्हटला तर पोरकट पण ठरविला तर गुन्हेगारीचा प्रकार आहे आणि त्याची तशीच संभावनाही झाली पाहिजे. गुजरातमधील अल्पसंख्य विरोधी दंगलींच्या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान होणो हीच मुळात देशातील 2क् कोटींएवढय़ा अल्पसंख्यकांना भयभीत करणारी घटना आहे. त्या दंगलीत मारल्या गेलेल्या दोन हजार लोकांची संभावना ‘गाडीखाली येऊन जनावरे मरतच असतात,’ अशी खुद्द मोदींनी करणो व झाल्या घटनेचा आपल्याला जराही पश्चात्ताप नसल्याचे त्यांनी सांगणो हा एका उद्दाम मनोवृत्तीचा पुरावा आहे.
कोणत्याही धर्माच्या अनुयायांच्या श्रद्धांना धक्का लावणो हा भारतीय दंडसंहितेनुसार जसा अपराध आहे तसे ते धर्मदृष्टय़ा पापही आहे. हिंदूंच्या पूजेत व्यत्यय आणणो किंवा ािश्चनांच्या प्रार्थनासभेत गोंधळ घालणो हा जेवढा गर्हनीय अपराध तेवढाच एखाद्याचा धार्मिक उपवास त्याच्या घशात अन्न कोंबून मोडीत काढणो हा अपराधही मोठा आहे. सारा प्रकार घडल्यानंतर अर्शद हा मुसलमान असल्याचे आम्हाला माहीत नव्हते, असे शिवसेनेच्या एका खासदाराने सांगणो हा शुद्ध मानभावीपणा व लुच्चेपणा आहे. दिल्लीतील या घटनेचा ‘लोकमत परिवार’ तीव्र निषेध करतो व लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे असणा:या सा:यांनी याबाबत संघटित भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन करतो.