लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात वारंवार श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. परंतु, त्यासाठी आवश्यक असलेल्या इजेंक्शनचाच तुटवडा पालिका रुग्णालयात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कुत्रा चालवल्यानंतर घ्याव्या इंजेक्शनसाठी सर्वसामान्य नागरिकांना खाजगी हॉस्पिटलची वाट धरावी लागत आहे. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन मोफत दिले जाते इजेंक्शनचा स्टॉक संपल्यामुळे तुटवडा निर्माण झाला असून लवकरच ते उपलब्ध होईल असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे .ठाणे शहरात ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तर शासनाचे जिल्हा शासकीय रुग्णालय अशी दोन मोठी रुग्णालये आहेत. कुत्रा चावलेल्या व्यक्तीला या दोन्ही हॉस्पिटलमध्ये अँटी रेबीज ही इंजेक्शन मोफत दिली जातात. खाजगी हॉस्पिटलमध्ये ती घ्यायला गेल्यास ३७५ रु पयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे बहुतांश नागरिक हे कुत्रा चालवल्यानंतर एकतर शिवाजी हॉस्पिटल किंवा कळवा हॉस्पिटल या दोनच ठिकाणी रु ग्णांना घेऊन जातात. पावसाळ्यामध्ये श्वानदंशाच्या घटनादेखील वाढतात. त्याची कारणेदेखील वेगवेगळी आहेत. पावसाळ्यात कुत्र्यांना निवारा नसल्याने तसेच त्यांचा प्रजनन काळदेखील असल्याने ते अधिक आक्र मक झालेले असतात. त्यामुळे सरकारी रु ग्णालयात येणाऱ्या रु ग्णांची संख्यादेखील वाढत असून शिवाजी हॉस्पिटलमध्ये साधी अँटी रेबीजची इंजेंक्शन उपलब्ध नसली तरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते उपलब्ध असल्याची माहिती सिव्हिल सर्जन केम्पी पाटील यांनी दिली. कळवा हॉस्पिटलमध्ये सध्या इंजेक्शन उपलब्ध नसल्याची पाटी लावण्यात आली आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक राजीव कोरडे यांनी दिली. सध्या नवीन निविदा प्रक्रि या सुरु असून लवकरच ते उपलब्ध होईल. पालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये इंजक्शन मोफत असल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा नागरिक पालिकेच्या रु ग्णालयात येतात. तब्बल १४ हजार नागरिकांना श्वानदंशठामपाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये तब्बल १४ हजार नागरिकांना श्वानदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तीन प्रकार श्रेणी करण्यात आल्या असून पहिल्या श्रेणीमध्ये केवळ कुत्र्याचा स्पर्श झाल्याची नोंद या श्रेणीमध्ये करण्यात येते. यामध्ये ४०८२ केसची नोंद झाली आहे. दुसऱ्या श्रेणीमध्ये कुत्र्याच्या माध्यमातून थोडे खरचटले असल्यास नोंद करण्यात येत असून अशा ८ हजार ६७८ केसची नोंद झाली आहे. तर कुत्र्याच्या चाव्याने जखम झाल्यास यात खऱ्या अर्थाने श्वानदंशाची नोंद होत असून यामध्ये १२६९ केसची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली.
पालिकेकडे अॅन्टी रेबीजचा तुटवडा
By admin | Published: July 10, 2017 3:59 AM