मुंबई : मंत्रालयापासून तालुक्यांच्या कार्यालयांपर्यंत सामान्य माणसांची सुनावणी नीट होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्याची दखल घेत आज सामान्य प्रशासन विभागाने काही निर्देश जारी करीत, ‘सामान्यांना भेटा, त्यांना नीट सहकार्य करा, असा सल्ला अधिकाºयांना दिला आहे. तसेच फायलींचा निपटारा किती दिवसांत करावा, याचे वेळापत्रकही जारी केले.मंत्रालयीन अधिकाºयांनी २.३० ते ३.३०, उपविभागीय व त्यावरील अधिकाºयांनी सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दु. ३ ते ५ अभ्यागतांच्या भेटीस राखून ठेवावा, भेटीच्या वेळा बोर्डावर लावाव्यात, असे बजावले आहे. या आदेशाची अंमलबजावणी १८ एप्रिलपासून केली जाणार आहे.- प्रत्येक शासकीय कार्यालयातील लिपिकाने त्याने केलेल्याकामाचा साप्ताहिक आढावा त्याच्या कार्यालय प्रमुखास सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक अधिकाºयाने त्याच्याकडीलफायलींचा पूर्ण निपटारा करून झीरो पेन्डन्सी आणली आहे कायाचे मूल्यांकन हा त्याच्या वार्षिक गोपनीय अहवालाचा भाग समजलाजाईल.- कोणत्याही कार्यालयात आलेल्या प्रकरणाचा निपटारा किती दिवसांच्या आत करावा याबाबतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.झीरो पेन्डन्सीचे वेळापत्रककार्यालयाचा क्षेत्रीय कार्यालयाची आवश्यकता क्षेत्रिय कार्यालयाचीस्तर नसेल तेव्हा (कार्यविवरण) आवश्यकता असेल तेव्हामंडळ १५ दिवस -तालुका ७ दिवस एक महिनाउपविभाग ७ दिवस दोन महिनेजिल्हा ७ दिवस तीन महिनेविभागीय/ ७ दिवस चार महिनेप्रादेशिकराज्य ७ दिवस पाच महिने
फायलींच्या निपटा-याचे आता अधिका-यांना वेळापत्रक; सामान्यांना भेटून सहकार्य करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:49 AM