शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

अनुसूचित जातीत अजूनही होतात बालविवाह

By admin | Published: January 22, 2016 3:26 AM

पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखण्याची घटना नुकतीच उघडकीस झाली असली तरी महाराष्ट्रात अजूनही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही.

मुंबई : पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखण्याची घटना नुकतीच उघडकीस झाली असली तरी महाराष्ट्रात अजूनही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही. प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात अनुसूचित जातींमध्ये अल्पवयात विवाह करण्याचे प्रमाण आजही लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. २०११च्या जनगणनेनुसार, १० ते १४ या गटातील १३ लाख ३१ हजार ९३० मुलांपैकी ४१, ४५२ मुलांचे याच वयात विवाह झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. या बालविवाहांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असून, २३,७५६ मुलींचा १४ वर्षे वयापर्यंत विवाह झालेला आढळून आला आहे. इतकेच नव्हे तर यातील १३८९ मुलींना याच वयामध्ये दुर्दैवाने वैधव्य आल्याचे निष्पन्न होत आहे. तसेच १० ते १४ या वयोगटातील विवाह होणाऱ्यांपैकी १३३३ लोक विभक्त झाले आहेत, तर २७६ जणांचा घटस्फोट झाल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मुलींना निरक्षर ठेवणे, मग मुलींचे अल्पवयात लग्न करून देणे आणि नंतर त्यांचा अल्पवयातील मृत्यू हे एक दुष्टचक्रच आहे. मुलींचा अल्पवयात विवाह झाल्यावर त्या स्वत:ची काळजी घेण्यासही सक्षम नसतात. अशा स्थितीत त्यांना गर्भधारणेला सामोरे जावे लागते, तसेच घरातील कामे, शेतीची कामेही त्यांच्या अंगावर पडतात. अपुरे पोषण झालेल्या मुलींचा प्रसूतीच्या वेळेस मृत्यू होण्याची शक्यता वाढते आणि त्यांची मुलेही कुपोषित जन्मतात. त्यामुळे सामाजिक कारणांनी तयार होणारे हे दुष्टचक्र भेदले पाहिजे. - वंदना खरे, सामाजिक कार्यकर्त्याअनुसूचित जातींमधील लोकसंख्येपैकी १० ते १४ या वयोगटामध्ये झालेल्या ४१, ४५२ विवाहांपैकी २३,३१२ विवाह ग्रामीण भागात झालेले आहेत. त्यामध्ये ८०० मुलींना आपले अहेवपण गमवावे लागले असून, ८३७ जणांनी विभक्त होण्याचा आणि १६६ जणांनी घटस्फोट घेतलेला आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे कमी प्रमाण, रूढी-प्रथांमुळे बालविवाहांची संख्या तेथे जास्त असल्याचे दिसून येते. आर्थिक दुर्बलतेमुळे व न परवडणाऱ्या आरोग्यसेवांमुळे या वयोगटात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यामुळेच वयाच्या १४ वर्षांपर्यंत ग्रामीण भागातील १२९९ विवाहितांना आपल्या जीवनसाथीचा मृत्यू पाहावा लागला आहे.