- गणेश वासनिक अमरावती : केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाटप गैरव्यवहारप्रकरणी नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) सादर केलेल्या अंतिम अहवालाच्या शिफारशीनुसार शैक्षणिक संस्थाचालकांचे ‘क्रॉस चेकिंग’ केले जाणार आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) निर्देशानुसार आदिवासी विकास विभागाने समित्यांचे गठन केले आहे.आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांनी १३ नोव्हेंबरला पाठविलेल्या पत्रानुसार ‘क्रॉस चेकिंग’साठी नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयाचे लेखा सहायक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. चौकशीअंती अपर आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.गठित समिती इतर अपर आयुक्त क्षेत्रातील तपासणी करणार आहे. एक अध्यक्ष व तीन सदस्य अशी या फेरतपासणी समितीची रचना आहे. यापूर्वी विशेष चौकशी पथकाने २०१० ते २०१७ काळातील गैरव्यवहारवरील अहवालानुसार संस्थाचालकांची समितीला फेरतपासणी करावी लागेल. एका समितीने किमान पाच संस्थांची तपासणी करणे गरजेचे आहे.‘जुन्या रेकॉर्ड’ची शोधाशोधयवतमाळ : शिष्यवृत्ती घोटाळ्याचा तपास ईडीकडून सुरू असून त्यासाठी आता जुन्या रेकॉर्डची शोधाशोध सुरू आहे.राज्यभरातील महाविद्यालयांमधील अनियमिततेचा आकडा १०० कोटींच्या वर असून महाविद्यालयांना ईडीने नोटीस बाजवल्या आहेत. परंतु, अनेक महाविद्यालयांमध्ये जुने रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने धास्ती आहे.यवतमाळ जिल्ह्यात ४०० शिक्षण संस्थांतून झालेल्या शिष्यवृत्ती वाटपाचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. जुने रेकॉर्ड शोधण्यासाठी १५ दिवसांपासून येथील समाज कल्याण कार्यालयात शोधाशोध सुरू आहे.
शिष्यवृत्ती घोटाळ्याचे होणार ‘क्रॉस चेकिंग’; ‘ईडी’चा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:21 AM