शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
4
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
5
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
6
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
7
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
8
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
9
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
10
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
11
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
12
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
14
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
15
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
16
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
17
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
18
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
19
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
20
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनतर्फे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

By admin | Published: June 16, 2015 3:05 AM

शासकीय शिष्यवृत्तीपासून वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वप्न साकारण्यासाठी

यवतमाळ : शासकीय शिष्यवृत्तीपासून वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वप्न साकारण्यासाठी जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अभियांत्रिकी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र गरजू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. शासनातर्फे काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण त्यांच्या आवाक्यात येते. मात्र ही शासकीय शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. उदा. जेईई परीक्षा. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे अनेक विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाही, किंवा आवश्यक कागदपत्रांची विहित मुदतीत पूर्तता करू शकत नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीच्या अटींची माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागते आणि त्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते. परंतु आता जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती ओपन, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी, ओबीसी, ईबीसी, जैन, मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन, बौद्ध या सर्वांसाठी उपलब्ध आहे. या संधीचा अधिकाधिक अभियांत्रिकी इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ्नािङ्म४ल्लंि३्रङ्मल्ल2015@१ी्िराों्र’.ूङ्मे या ईमेलवर किंवा ९७३०६६३०६८ या क्रमांकावर संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)