शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

शाळकरी मुलीचा बलात्कार करून खून

By admin | Published: January 06, 2017 10:03 PM

माळवाडी (ता. पलूस) येथील चौदावर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला.

ऑनलाइन लोकमतसांगली/भिलवडी, दि. 6 - माळवाडी (ता. पलूस) येथील चौदावर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. आज सकाळी साडेआठला ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण व भिलवडी पोलिसांनी भिलवडी, माळवाडी, अंकलखोप येथे छापे टाकून सायंकाळपर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या नावांबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ कृष्णाकाठच्या गावात बंद पुकारण्यात येणार असून, भिलवडीतून मूक मोर्चाही काढला जाणार आहे.पीडित मृत मुलगी आई व बहिणीसोबत माळवाडीतील चव्हाण प्लॉट परिसरात रहात होती. चार वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती जवळच भिलवडी येथील सेकंडरी स्कूलमध्ये आठवीत शिकत होती. तिची आई सूतगिरणीत नोकरीस आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. गुरुवारी रात्री तिचा आईशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादातून ती साडेआठ वाजता घरातून बाहेर पडली होती. रात्रीचे दहा वाजले तरी ती घरी आली नव्हती. त्यामुळे आईने परिसरात जाऊन तिचा शोध घेतला. तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी केली, तथापि तिला कोणीच पाहिले नसल्याचे सांगण्यात आले. आई रात्रभर तिचीप्रतीक्षा करत बसली होती, पण ती घरी परतलीच नाही. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता भिलवडी-तासगाव रस्त्यावररील धान्य गोदामाजवळ या मुलीचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती भिलवडी पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिसनिरीक्षक सुनील हारुगडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. माळवाडीतील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक वैशाली शिंदे, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील, गुंडाविरोधी पथकाचे निरीकक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाजवळ संशयास्पद काहीच सापडले नाही. तिचा बलात्कार करून खून केल्याचा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी बांधला. तशा महत्त्वाच्या खुणा पंचनामा करताना आढळून आल्या. परंतु शवविच्छेदन केल्यानंतरच खरे कारण पुढे येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मृतदेह विच्छेदन तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत न्यायवैद्यक अधिकाऱ्यांच्याउपस्थितीत विच्छेदन तपासणी सुरू होती. (प्रतिनिधी/वार्ताहर)संशयितांची धरपकडजिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संशयितांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण, भिलवडी व पलूस पोलिसांनी माळवाडी, भिलवडी व अंकलखोप परिसरात आज दिवसभर छापे टाकले. मृत मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर कोठे गेली, याची माहिती त्यांनी घेतली. सायंकाळपर्यंत चार संशयित ताब्यात घेतले होते. पण त्यांच्या नावांबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.